एकीकडे लोकसंसख्या वाढत आहे म्हणून काही देशातील लोकांवर मुलांना जन्म देण्याबाबत काही बंधने टाकली गेली आहे. तर कुठे 'हम दो हमारे दो' चा नारा दिला जात आहे. पण जगात तब्बल २१ बाळाला जन्म देणारी एक महिलाही आहे. आता या परिवारात एकूण २३ सदस्य झाले असून या परिवाराला जगातली सर्वात मोठी सिंगल फॅमिली सांगितलं जात आहे. बरं ही घटना कुठल्या मागासलेल्या नाही तर ब्रिटनसारख्या विकसीत देशातील आहे.
मंगळवारी आपल्या २१वा बाळा जन्म देणाऱ्या महिलेचं नाव Sue Radford असं आहे. या महिलेने मे महिन्यात एक व्हिडीओ यूट्यूबर अपलोड केला होता. त्यातून तिने गर्भवती असल्याची माहिती दिली होती. आता या २१ व्या बाळानंतर त्यांनी पुन्हा बाळ होऊ देणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
तेच या महिलेचा पती Noel यांचं म्हणनं आहे की, 'मला नाही वाटत की, कुणी २१ मुलांना जन्म देण्याबाबत विचार करत असतील. आम्ही विचार केला होता की, आम्ही तीन बाळांना जन्म देऊ. काही लोक २ ते ३ मुलांनंतर थांबतात. आम्ही आता २१ वर येऊन थांबलो'.
मीडिया रिपोर्टनुसार, ही महिला १४ वर्षांची असताना पहिल्यांदा बाळाला जन्म दिला होता. तिचा सर्वात मोठा मुलगा आता ३० वर्षांचा आहे. इतकेच नाही तर तिच्या सर्वात मोठी मुलीचं म्हणनं आहे की, तिचे आई-वडील इतक्या ऑड नंबरवर थांबणार नाहीत.
Sue आपल्या आयुष्यातील ८११ आठवडे गर्भवती राहिली. आता तिला तिच्या मुला-मुलींसोबत आणि नातवंडांसोबत आनंदाचं जीवन जगायचं आहे. बरं आणखी एक आश्चर्याची गोष्टी म्हणजे इतका मोठा परिवार असूनही त्यांच्याकडे ना क्रेडिट कार्ड आहे ना कोणतं फायनान्स अॅग्रीमेंट.