Woman Pregnant with Friend Sperm: आयुष्मान खुराणा याचा 'विकी डोनर' सिनेमा तर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. यात अभिनेता अशा महिलांना स्पर्म डोनेट करतो, ज्या त्यांच्या पतीच्या कमजोरीमुळे आई होऊ शकत नाही. असंच काहीसं एका व्यक्तीने केलं. एका महिलेने स्पर्म डोनेशनचा आधार घेतला. तिने आपल्या बालपणीच्या मित्राकडून स्पर्म घेऊन आई बनण्याचा निर्णय घेतला.
'द मिरर'च्या वृत्तानुसार, ३० वर्षीय महिलेने तिच्या बालपणीच्या मित्रावर विश्वास दाखवला आणि त्याला स्पर्म डोनर बनण्यास सांगितलं. महिलेला माहीत होतं की, तिच्या मित्राचं आरोग्य चांगलं आहे आणि त्याची कोणतीही खराब मेडिकल हिस्ट्री नाही. जेव्हा तिने तिच्या मित्राला स्पर्म डोनर बनण्यास सांगितलं तर तो एका अटीवर महिलेच्या बाळाचा पिता होण्यास तयार झाला. ती अट म्हणजे तो वडील असण्याचं कोणतंही कर्तव्य निभावणार नाही.
महिलेचा मित्र विवाहित होता. पण त्याने स्पर्म डोनेशनबाबत आपल्या पत्नीला काहीच सांगितलं नाही. तिला न सांगताच त्याने आपल्या मैत्रिणीला स्पर्म डोनेट केलं. यानंतर आता या व्यक्तीची महिला मित्र जुळ्या बाळांची आई होणार आहे. ही व्यक्ती महिलेचा हायस्कूलच्या काळापासूनचा मित्र आहे. आता IVF टेक्निकच्या माध्यमातून ती लवकरच दोन बाळांची आई होणार आहे. महिलेने सोशल मीडियावर या घटनेबाबत माहिती दिली.
महिलेने सांगितलं की, इथपर्यंत तर सगळं काही ठीक होतं. पण प्रेग्नेन्सीनंतर तिने तिच्या मित्राला आणि त्याच्या पत्नीला डीनरसाठी बोलवलं. तिला त्या दोघांचे आभार मानायचे होते. तोपर्यंत महिलेला हे माहीत नव्हतं की, मित्राच्या पत्नीला याबाबत काहीच माहीत नाही. पण जेव्हा मित्राच्या पत्नीला जेव्हा हे समजलं तेव्हा ती भडकली. यानंतर तीन दिवस यावर वाद सुरू राहिला. पत्नीचा आरोप होता की, याबाबत तिला कुणीच काही सांगितलं नाही.