उत्तरप्रदेशातील गाझियाबादच्या एका महिलेला कंपनीनं व्हेज देण्याऐवजी नॉनव्हेज पिझ्झा दिला. ही बाब कंपनीच्या चांगलीच अंगाशी आली आहे. आता या महिलेनं कंपनीवर धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याचा दावा करत कंपनीला १ कोटी रूपये देण्याची मागणी केली आहे. गाझिबादच्या एका शााकाहारी महिलेनं अमेरिकन रेस्टॉरंटमधून पिझ्झा ऑर्डर केला. पण त्यांनी चुकून या महिलेला नॉनव्हेज पिझ्झा पाठवला. आपल्या धार्मिक भावनांना दुखावल्याचा आरोप करत कंपनीविरुद्ध १ कोटी रुपयांची भरपाई देण्याचा दावा केला आहे. आता या कठोर नियमांमधून जावं लागणार असल्याचं या महिलेचं मत आहे.
वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार दीपाली त्यांनी आपल्या याचिकेमध्ये दावा केला आहे की, ते आपल्या धार्मिक परंपरा, शिक्षण आणि कौटुंबिक परंपरेपासून शुद्ध शाकाहारी आहेत. आणि नॉनव्हेज पिझ्झा खाल्यानंतर त्यांनी पिझ्झा खाणचं बंद केलं आहे. ही घटना जवळपास २ वर्ष जूनी म्हणजेच २१ मार्च २०१९ ची असून आता पुन्हा एकदा ही घटना चर्चेत आली आहे. दिपाली यांनी होळीच्या दिवशी कुटुंबीयांतील लोकांसाठी पिझ्झा आऊटलेटमधून पिझ्झा मागवला होता.
ऑर्डर येताच जास्तवेळ न घालवता त्यांनी पिझ्झा खायला सुरूवात केली. खास खाल्यानंतर त्यांना जाणवलं की, मशरूम ऐवजी मांसाच्या तुकड्यांच्या पिझ्झ्यात समावेश आहे. दिपालीचे वकील फरगत वारसी यांनी ग्राहक न्यायालयात सांहितले की, हा प्रकार घडल्यानंतर दिपाली यांनी लगेचच ग्राहक सेवा अधिकारी यांना फोन केला. व्हेज पिज्जाऐवजी नॉनव्हेज पिझ्झा देण्याबाबत तक्रार दाखल केली होती. हृदयस्पर्शी! त्सुनामीपासून बेपत्ता झाली पत्नी, १० वर्षांपासून समुद्राच्या तळाला जाऊन घेतोय तिचा शोध!
एएनआयच्या रिपोर्टनुसार काही दिवसांपूर्वी पिझ्झा आऊटलेटच्या प्रबंधकांनी दिपाली यांनी फोन केला होता आणि तक्रारदारांच्या संपूर्ण कुटुंबाला मोफत पिझ्झा देण्याचं आश्वासन दिलं. परंतू तक्रारदारांच्यामते हा प्रश्न फक्त पिझ्झाच्या चुकीबाबत नाही तर धार्मिक विश्वास आणि प्रथांना ठेच पोहोचवण्याचा आहे. तक्रारदारांच्या वकिलानं केलेल्या दाव्यानुसार त्यांच्या आशिलाल मानसिक आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यांना आता संपूर्ण आयुष्य उपचारांसाठी लाखो रूपये खर्च करावे लागू शकतात. लग्नानंतर उलगडलं २५ वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य, वर्षभर करत राहिली गर्भवती होण्याचा प्रयत्न...