जगभरातून नेहमीच अशा अशा अजब आजारांची माहिती समोर येत असते ज्यांचा आपण कधी विचारही केलेला नसतो. असे अजब आजार असणारे अनेक लोक जगात आहेत. कुणाला हवेची एलर्जी असते तर कुणाला आणखी कशाची. इतकंच काय तर काही लोकांना जेवणाचीही एलर्जी असते. अशीच एक घटना समोर आली आहे.
हे सगळ्यांना माहीत आहे की, जीवन जगण्यासाठी जेवण करणं किती महत्वाचं आहे. जर अशात एखाद्याला जेवणाचीच एलर्जी असेल तर त्यांचं जीवन कसं राहत असेल? एका तरूणीला हीच समस्या आहे. ती असं काहीच खाऊ शकत नाही जे सामान्य लोकांच्या रोजच्या आहारात असतं. मग ती जगते कशी? असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. सामान्यपणे चपाती आणि भात जेवणातील मुख्य पदार्थ असतात. पण तिला तेच खाता येत नाहीत.
चपाटी, भाताची एलर्जी
अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्समध्ये राहणाऱ्या या तरूणी विचित्र एलर्जी आहे.24 वर्षीय कॅरोलिन क्रे ची समस्या ऐकून धक्का बसू शकतो. पण तिला एक असा आजार झाला आहे ज्यामुळे ती चपाती, भात, मासे, शेंगदाणे, तीळ-मोहरी काहीच खाऊ शकत नाही. जर यातील तिने काहीही खाल्लं तर तिला एनाफिलॅटिक शॉक लागू शकतो आणि ती मरणाच्या दारात पोहोचू शकते.
दोनदा वाचला जीव
सप्टेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा तिला ही एलर्जी झाली होती. तेव्हा तिने आइसक्रीम खाल्लं होतं आणि 12 तास तिला हॉस्पिटलमध्ये रहावं लागलं होतं. इतकंच नाही तर नंतर पिझ्झा, ब्रेड, भात आणि बीन्स खाऊनही आयसीयूमध्ये रहावं लागलं होतं. तिला एलर्जी दरम्यान गळ्यावर सूज, खाज होते. अशात आता ती केवळ दोन गोष्टींवर जिवंत आहे. ते म्हणजे ओटमील आणि लहान मुलांना दिलं जाणारं फॉर्मूला मिल्क. ती दिवसातून तीन वेळा हे खाऊन जिवंत राहत आहे.