आतापर्यंत सिनेमातून किंवा रिअल लाइफ तुम्ही वेगवेगळ्या आश्चर्यकारक अशा लव्हस्टोरी पाहिल्या असतील. पण तुम्ही पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या लव्हस्टोरीपेक्षा फार वेगळी लव्हस्टोरी समोर आली आहे. ही लव्हस्टोरी आहे अमेरिकेत राहणाऱ्या जेसिकाची. ही लव्हस्टोरी तशी काही महिने जुनीच आहे पण फारच इंटरेस्टींग अशी आहे. जेसिकाने जवळपास १४ वर्षांपूर्वी म्हणजे २००५ मध्ये आई होण्यासाठी एका स्पर्म डोनरची मदत घेतली होती. यातून जेसिकाने एका मुलीला जन्म दिला आणि तिचं नाव एलिस ठेवलं.
आता जेसिकाची मुलगी १४ वर्षांची झाली आहे. तिला बऱ्याच गोष्टी समजायल्या आहेत. त्यामुळे तिने एकदा आईला वडिलांबाबत काही प्रश्न विचारले. नंतर ती वडिलांना भेटण्याचा हट्ट करू लागली. मग काय मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी जेसिकाने 'त्या' स्पर्म डोनरचा शोध सुरू केला. मोठ्या मेहनतीनंतर जेसिकाने हॉस्पिटल आणि स्पर्म डोनर वेबसाइटच्या माध्यमातून डोनरला शोधलं आहे.
(Image Credit : BBC)
जेसिकाने सांगितले की, मी त्यावेळी स्पर्म बॅंकमध्ये जाऊन खेळ आणि वाचन असा क्षेत्रात आवड असणाऱ्या व्यक्तीच्या स्पर्मची मागणी केली होती. बॅंकने माझ्या गरजेनुसार स्पर्म उपलब्ध करून दिले आणि मी आई झाले. बॅंकेच्या नियमानुसार, कधीही स्पर्म डोनरचं नाव उघड केलं जात नाही, त्यामुळे मी या व्यक्तीला कधीही भेटले नव्हते.
दरम्यान, आता मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी जेसिकाने फार मेहनत घेतली. जेसिकाने डीएनए वेबसाइटची मदत घेतली. अनेक दिवसांच्या शोधानंतर जेसिकाने एलिसच्या वडिलाचा शोध घेतला. त्याचं नाव आरोन आहे आणि तो अमेरिकेतील सीटेल शहरात राहणार आहे. आरोन स्पर्म डोनर म्हणूण अनेक मुला-मुलींचा वडील आहे.
(Image Credit : AmarUjala)
जेसिकाने सांगितले की, अनेक प्रयत्नांनंतर आता कळाले आहे की, माझ्या मुलीचा वडील आरोन आहे आणि तो एक लेखक आहे. २००५ दरम्यानचा त्याच्या जीवनाचा काळ फारच अडचणींचा होता. तेव्हा त्याला फार आर्थिक अडचण होती. तर आरोनचं म्हणणं आहे की, लवकरच आम्ही दोघे डेटला जाणार आहोत, त्यानंतर आम्ही लग्न करू. मुलीच्या हट्टासाठी आरोन आणि जेसिकाने लग्नाचा निर्णय घेतला आहे.