स्कॉटलॅंडची(Scotland) राजधानी Edinburgh मध्ये रस्त्याने जात असलेल्या एक महिला आणि पुरूषात २०१९ मध्ये भांडण झालं होतं. या भांडणादरम्यान महिलेने त्या व्यक्तीला किस करत त्याच्या जिभेचा लचका तोडला होता. जेव्हा व्यक्तीने जिभेचा तुकडा जमिनीवर थुंकला तेव्हा तिथे असलेला एक पक्षी तो जिभेचा तुकडा घेऊन उडाला होता. त्यामुळे त्या व्यक्तीवर सर्जरी करता आली नाही आणि तो नेहमीसाठी मुका झाला. या प्रकरणी गेल्या गुरूवारी निर्णय देत कोर्टाने महिलेला दोषी ठरवलं आहे.
नेमकं काय झालं होतं?
१ ऑगस्ट २०१९ ला सायंकाळी James McKenzie रस्त्याने जात होता. अचानक रस्त्याने जाताना २७ वर्षीय Bethaney Ryan त्याच्यासोबत काही कारणाने वाद झाला. त्यांचा हा वाद मारझोडवर गेला. भांडणादरम्यान बेथनीने अचानक जेम्सवर झडप घेतली आणि त्याला जबरदस्ती किस करत दाताने त्याच्या जिभेचा लचका तोडला. काही समजायच्या आत जेम्सने तोंडातून तुटलेला जिभेचा तुकडा जमिनीवर थुंकला. तो तुकडा तिथेच असलेला सीगल पक्षी घेऊन उडाला. (हे पण वाचा : OMG! टॉयलेटमध्ये गेलेल्या महिलेवर अस्वलाने केला हल्ला, वाचा पुढे काय झालं?)
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेची सुनावणी Edinburgh Sheriff Court मध्ये सुरू होती. जेम्सची वकिल सुजैन डिक्सनने कोर्टाला सांगितले की, वादानंतर जेव्हा जेम्स आरोपीकडे वळला तर तिने जेम्सला धक्का दिला आणि नंतर त्याला जबरदस्ती किस केलं. यादरम्यान ती जेम्सच्या जिभेला चावली आणि जिभेचा तुकडा पाडला. (हे पण वाचा : परीक्षा द्यायला गेली अन् बंद खोलीत प्रियकरासोबत विचित्र अवस्थेत सापडली, पोलिसांनी लग्नच लावलं)
महिला ठरली दोषी
सुजैनने कोर्टात सांगितले की, बेथनीच्या या कृत्यामुळे जेम्स नेहमीसाठी मुका झालेला आहे. ती म्हणाली की घटनेनंतर रक्ताने माखलेल्या जेम्सला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. पण सर्जरी करता आली नाही. कारण त्याच्याकडे त्याच्या जिभेचा तुकडा नव्हता. सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने बेथनी रेयानला जेम्सला धक्का देणे, जबरदस्ती किस करणे आणि जिभेला चावा घेणे यासाठी दोषी ठरवलं.