वाद कुणाचे होत नाहीत, सगळेच करतात. पण हे वाद चर्चा करून मिटवले जातात. पण दोन व्यक्तींमधील भांडणाचा तिसऱ्याच व्यक्तीला फुकटात लाखोंचा फायदा झालं असं कधी बघायला मिळालं नाही. मात्र, असं प्रत्यक्षात झालं आहे. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. फ्लोरिडातील एका क्लीअर स्काय कॅफेमध्ये बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेन्डचं भांडण झालं आणि भांडणाच्या तावातावात तरूणीने हॉटेलमध्ये ३ लाख ४३ रूपपयांची टिप दिली. ती सुद्धा तिच्या बॉयफ्रेन्डच्या क्रेडीट कार्डने.
(Image Credit :BuzzFeed News)
तरूणीचं नाव सेरीना असून ती तिच्या बॉयफ्रेन्डसोबत वाद घालत होती. न्यूयॉर्कला घरी जाण्यासाठी प्लेनचं तिकीट खरेदी करून दे, यावरून हा वाद सुरू होता. पण तिच्या बॉयफ्रेन्डने नकार दिला. दोघांमध्ये चांगलंच खडाजंगी भांडण झालं. त्याच्या नकाराचा बदला घेण्यासाठी नंतर रागारागात सेरीनाने हॉटेलमध्ये ५ हजार डॉलरची टिप दिली. पण त्यांचं बील केवळ ५५ डॉलर इतकंच झालं होतं. भारतीय करन्सीनुसार, ही रक्कम ३७०० रूपये इतकी होते.
(Image Credit : JOE.ie)
या प्रकरणी पोलिसांनी सेरीनाला नंतर अटकही केली. बॉयफ्रेन्डने सांगितले की, सेरीनाने मद्यसेवन केलं होतं. सध्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्या व्यक्तीचं क्रेडीट कार्ड आहे, त्याच्या परवानगीशिवाय त्याचा वापर करणे हा इथे गुन्हा आहे. तो तिने केला होता. त्यामुळे सेरीनाला १ हजार डॉलरचा दंडही भरावा लागणार आहे.