Special Massage Ruptured Women’s Kidney : लोक सुंदर दिसण्यासाठी नको नको ते करत असतात. काही लोक तर त्वचा आणि चेहऱ्यातही कॉस्मेटिक सर्जरीने बदल करतात. तर काही लोक वजन कमी करण्याच्या नादात खाणं-पिणं सोडतात. इतकंच नाही तर लोक जास्त प्रमाणात व्यायाम आणि पोषक तत्वही सोडतात. पण एका महिलेने वजन कमी करण्याच्या नादात मालिश केली, ज्यामुळे तिची किडनी फुटली.
वजन कमी करण्यासाठी इंटेन्स एक्सरसाइज आणि क्रॅश डायटिंगनंतर एका महिलेने खास मसाज करून घेतली. ज्यामुळे तिला वेदना होऊ लागल्या होत्या. जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि डॉक्टरांनी चेकअप केलं तर दिसलं की, तिची किडनी फुटली आहे. ही घटना चीनच्या जेजियांग प्रांतातील हांगजाऊमधील एका सलूनमधील आहे. इथे महिलेला खास वेट लॉस मसाज दिली जात होती.
41 वर्षीय महिला हांगजाऊ एका सलूनमध्ये आपलं वजन कमी करण्यासाठी एक खास मसाज घ्यायला गेली होती. तिच्या पोटाच्या खालच्या भागात मसाज केली जात होती. तेव्हा तिला जोरात वेदना झाली. जेव्हा मालिश करणाऱ्याकडे तिने तक्रार केली, तर ती म्हणाली की, हे शरीरातून फॅट सोडण्यामुळे होत आहे. यादरम्यान महिलेने खूप वेदना सहन केली आणि शेवटी ती उभीही राहू शकत नव्हती.
तिला उलटी आणि डायरियाची समस्या होऊ लागली होती. जेव्हा ती परिवारासोबत हॉस्पिटलमध्ये गेली तर डॉक्टरांनी तिचं सिटी स्कॅन केलं. ज्यातून समोर आली की, तिची डाव्या बाजूची किडनी फुटली आहे.
डॉक्टरांनी सांगितलं की, महिलेच्या किडनीमधील बेनाइन ट्यूमर केवळ आणि केवळ जोर लावून करण्यात आलेल्या मसाजमुळे फुटलं आहे आणि त्यात ब्लीडिंग सुरू झालं. डॉक्टरांनुसार, हा काही खतरनाक ट्यूमर नसतो आणि याने काही नुकसानही होत नाही. जर मसाज जोरात केली नसती तर कदाचित हे फुटलंही नसतं. सध्या महिलेचं ऑपरेशन करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरू आहेत.