मनुष्याचं शरीर हे निसर्गाने रचलेल्या सर्वात कठिण गोष्टींपैकी एक आहे. आपल्या शरीरात कधी कोणता आजार होईल आणि त्याचा काय प्रभाव होईल काही सांगता येत नाही. ब्रिटनमधील एका महिलेला सर्दी-पळशाची लक्षणं दिसल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. महिला जेव्हा हॉस्पिटलमधून घरी केली तेव्हा ती तिचं आधीचं २० वर्षांचं आयुष्य विसरली (Woman Lost Memory Due to Cold) होती.
क्लेअर मफेट (Claire Muffet) नावाच्या महिलेचं वय ४३ वर्षे आहे. तिची तब्येत २०२१ मध्ये बिघडली होती. इन्सफेलायटिसमुळे तिला सर्दी झाली होती आणि ती झोपली. सकाळी पतीने तिला उठवलं तर ती उठू शकली नाही. त्यामुळे तिला अॅम्बुलन्सने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिला याचा जराही अंदाज नव्हता की, हॉस्पिटलमधून परत आल्यावर तिचं आय़ुष्य इतकं बदललेलं असेल.
क्लेअऱ मफेट ब्रूमफिल्डच्या हॉस्पिटलमध्ये भरती होती. तिथे ती बेशुद्ध पडली होती. त्यानंतर तिला काही दिवस लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. पण तिची तब्येत काही ठीक झाली नाही. मफेटला रॉयल लंडन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. न्यूरोलॉजिस्टने सांगितलं की क्लेअर मफेटच्या मेंदूत एन्सेफलायटिसमुळे सूज आली होती. तिला तब्बल १६ रात्रीनंतर जाग आली. पण तोपर्यंत ती तिचं आधीचं सगळं आयुष्य विसरलेली होती. डॉक्टरांनी सांगितलं की, हे मेंदूत ताप गेल्याने झालं. कारण यामुळे तिच्या मेंदूत सूज आली होती.
Daily Star सोबत बोलताना मफेटने सांगितलं की, ती हॉस्पिटलमधून परत आल्यावर पती आणि लग्नाबाबत सगळं विसरलेली होती. तिला तिचे मुलंही आठवत नव्हते. एकूणच ती तिच्या आयुष्यातील साधारण २० वर्षे विसरली होती. सुदैवाने आता हळूहळू तिची स्मरणशक्ती परत येत आहे. तिला हळूहळू काही गोष्टी आठवत आहेत. पण जुन्या गोष्टी आठवण्यात तिला त्रास होतो. आता जुन्या गोष्टी परत आठवण्याची शक्यता कमी झाली आहे. पण ती नव्या आठवणी तयार करत पुढे जात आहे. यात तिची मुलं आणि पती तिला साथ देत आहेत.