वेगवेगळ्या सिनेमांमध्ये तुम्ही महिला भूतांसोबत लग्न करताना पाहिलं असेल. खरंतर या काल्पनिक गोष्टी सिनेमात बघणं फारच रोमांचक वाटतं. आपण ते बघत असताना त्यात हरवूनही जातो. नंतर बाहेर आलो की, ते विसरून जातो. पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, एका महिलेने भूतासोबत लग्न केलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? आमचाही यावर विश्वास नाही.
भलेही भूत-प्रेत-आत्मा या गोष्टी अंधश्रद्धा किंवा खोट्या गोष्टी असतील पण आजही काही लोकांच्या मनात या गोष्टींनी घर केलं आहे. त्यांना कदाचित आता या महिलेचंच घ्या ना, तिने तब्बल ३०० वर्ष जुन्या भूतासोबत लग्न केल्याचा दावा केला आहे. आता यावर हसावं की, रडावं हेच कळत नाहीये. पण तरी जाणून घेऊ नेमकं प्रकरण तरी काय आहे.
Amanda Teague असं या महिलेचं नाव असून ती ४५ वर्षांची आहे. ५ मुलांची आई असलेली ही महिला गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती कारण तिने एका ३०० वर्ष जुन्या भूताशी लग्न केलं. Amanda ने एका Haitian समुद्री डाकूसोबत लग्न केलं. तिने याबाबत सांगितले की, त्याच नाव आहे जॅक. तो १८व्या शतकात समुद्रात दरोडेखोर होता. इतकेच नाही तर Amanda सांगते की, ती त्याच्यासोबत २०१४ पासून बोलते.
People.com ला दिलेल्या मुलाखतीत या महिलेने सांगितले की, जेव्ह ती जॅकसोबत वेळ घालवू लागली, त्यांची भावना तीव्र होऊ लागल्या होत्या. ती सांगते की, 'आधी तर मी याकडे दुर्लक्ष केलं'. तिने सांगितले की, याआधीही तिने भूतांशी संवाद साधला. पण जॅकसोबतचं फिलिंग वेगळं होतं. इतकं की, दोघांमध्ये शारीरिक संबंधही झालेत. ती सांगते की, याला Spectrophilia म्हटलं जातं. हे आयर्लंडमध्ये शिकवलं जातं की, कशाप्रकारे ज्या व्यक्तीसोबत तुमचे शारीरिक संबंध सुरू आहेत, त्याच्याशी तुम्ही लग्न करू शकता. त्यानुसार दोघांनी लग्न केलं.
Amanda ने सांगितले की, त्यांनी एका बोटवर लग्न केलं आणि या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आले होते. भूताकडून रिंग घालण्यासाठी त्यांनी एका मध्यस्थी व्यक्तीलाही बोलवलं होतं. ती सांगते की, तिचा पती जॅक स्पॅरोसारखा वाटतो. लग्न तर झालं. पण नंतर एक वाईट बातमी आली.
डिसेंबर २०१८ मध्ये Amanda ने घोषणा केली की, तिचं लग्न संपुष्टात आलं. म्हणजेच जॅक नावाचं भूत आणि ती वेगळे झाले आहेत. हे नातं आता संपलं आहे. 'द सन' दिलेल्या मुलाखतीत Amanda ने सांगितले की, जॅकने तिला दोनदा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लग्नानंतर तिची तब्येतही बरोबर राहत नव्हती. ज्यामुळे दोघे वेगळे झालेत.