Tiger attack : जंगली प्राण्यांपासून सगळ्यांनाच भिती वाटते. खासकरून वाघ, सिंह आणि बिबटे. यांचा सामना झाला तर मृत्यू निश्चित असतो. रशियात राहणाऱ्या 26 वर्षीय डार्या उल्यानोवाने कधी विचारही केला नसेल की, तिचा मृत्यूसोबत असा सामना होईल. कारने जंगलाच्या रस्त्याे जात असताना अचानक तिला लघवी आली. ती गाडीतून उतरली आणि झुडपांमध्ये लघवीसाठी गेली तेव्हाच तिच्यावर वाघाने हल्ला केला.
डार्यावर जगातल्या सगळ्यात मोठ्या वाघांपैकी एकाने हल्ला केला होता. या घटनेवेळी डार्यासोबत तिचा पती होता. जेव्हा त्याने पाहिलं की, वाघ त्याच्या पत्नीला जबड्यात पकडून खेचत नेत आहे तर तो वाघाच्या दिशेने गाडी पळवली. पण यादरम्यान वाघाने डार्याच्या शरीराचे अनेक लचके तोडले होते. वाघ तिला सोडून पळाला. त्यानंतर तिला पतीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण वाघाने तिचे दोन्ही खांदे शरीरापासून वेगळे केले होते.
हॉस्पिटलमध्ये गंभीर स्थितीत डार्याला भरती करण्यात आलं. तिला दोन्ही खांदे नव्हते. सोबतच तिच्या मानेवरही गंभीर जखमा होत्या. डॉक्टरांनी तिला लगेच आयसीयूमध्ये दाखल केलं. तिच्या जखमा शिवण्यात आल्या. अशात डार्याचा जीव वाचणं एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिने तिचा जीव वाचवण्याचं श्रेय पतीला दिलं. ती म्हणाली की, जर तिला पती नसता तर ती आज जिवंत नसती. तिच्या पतीने कारच्या माध्यमातून वाघाला पळवून लावलं होतं. डार्या म्हणाली की, वाघाने तिला पळण्याची संधीच दिली नाही. काही पावलं चालली आणि वाघाने तिच्यावर उडी घेतली.
डार्याने पुढे सांगितलं की, ती झाडांमध्ये लघवी करण्यासाठी गेली होती. तेव्हाच तिला समोर एक वाघ दिसला. ती लगेच पळाली, पण वाघाने उडी घेत तिला खाली पाडलं. वाघाने आधी तिचा एक हात वेगळा केला आणि नंतर पंजाने दुसरा खांदा वेगळा केला. तिचा आवाज ऐकून पती गाडी घेऊन लगेच तिथे आला. त्याने गाडीने वाघाला पळवून लावलं. वाघही घाबरून पळून गेला. त्यानंतर डार्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी लगेच तिच्यावर उपचार केले म्हणून तिचा जीव वाचला.