अमेरिकेच्या वॉश्गिंटन येथे एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका भीषण अपघातात महिलेचा जीव थोडक्यात बचावला आहे. ज्याने कुणीही या अपघाताचे फोटो पाहिले त्याला महिलेचा जीव वाचणं चमत्कारापेक्षाही कमी नाही असं वाटत आहे. ८ चाकी ट्रकनं महिलेच्या कारला जोरदार धडक मारली त्यानंतर ट्रकनं या कारला अक्षरक्ष: खाली चिरडलं परंतु या अपघातात महिलेला फक्त किरकोळ जखम झाली आहे त्यामुळे सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
ही घटना मंगळवारी वॉश्गिंटनच्या माउंट वर्नोन रिवर ब्रिजवर घडली. महिला तिच्या कारने जात होती. तेव्हा अचानक मागून आलेल्या वेगवान ट्रकनं कारला जोरात धडक दिली. त्यानंतर ही कार जागीच वळाली. त्यानंतर ट्रकनं कारला चिरडलं. स्टेट ट्रूपर रॉकी ओलिफंत यांनी या घटनेचा फोटो ट्विट केला आहे. त्यात म्हटलंय की, या भीषण अपघाताबद्दल काही बोलायला शब्द नाहीत. चमत्कार असल्याप्रमाणे महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. माझ्या १४ वर्षाच्या कारकिर्दीत असा अपघात कधीच पाहिला नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले त्यानंतर अपघाताची चौकशी सुरु केली. कारमध्ये आत अडकलेल्या महिलेला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी एक ट्रो ट्रक आणला होता. जसं कारच्या वरुन ट्रकला हटवलं तसं महिला त्यातून बाहेर पडली हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बघणारा प्रत्येक जण हैराण झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेच्या डोक्याला हलका मार लागला आहे. तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ओलिफंतने फॉक्स १३ सांगितले की, जेव्हा पोलीस पोहचले तेव्हा कारमधून कुणाचा तरी आवाज ऐकायला येत होता. ट्रकखाली चिरडल्या गेलेल्या कारमध्ये एक महिला होती. जी कारमधून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होती. ही शब्दात सांगणं कठीण आहे. इतक्या भीषण दुर्घटनेतून कसं कोण वाचेल? असाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे.