ऑनलाईन शॉपिंगचे अनेक वाईट अनुभव तुम्हाला आले असतील. बऱ्याच जणांना ते येतात. अनेकदा कंपनीकडून चुकीचं सामान डिलिव्हर केलं जातं. लोक याबाबत तक्रारही करतात. मात्र, अमेरिकेतील एका महिलेसोबत भलताच किस्सा घडलाय. ऑनलाईन साईटवरुन या या महिलेनं खुर्ची ऑर्डर केली होती (Woman Ordered a Chair Online). तिला खुर्ची तर मिळाली मात्र त्यात एक गडबड होती.
मिरर वेबसाईटच्या वृत्तानुसार, मरियम नावाच्या एका महिलेनं टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर करत सांगितलं, की तिला कशाप्रकारे ऑनलाईन शॉपिंगचा वाईट अनुभव आला. मरियम एकदा एका वेबसाईटवर सामान बघत होती. तेव्हाच तिची नजर एका अतिशय सुंदर खुर्चीवर पडली, याला वेलवेट लावलेलं होतं. ही खुर्ची पाहताच तिला ती खरेदी करण्याची इच्छा झाली.
तिने ही खुर्ची ऑर्डर केली. मात्र, ऑर्डर डिलिव्हर होताच मरियमला धक्का बसला. व्हिडिओमध्ये मरियमने दाखवलं की ही खुर्ची खेळण्यातील होती आणि तिची साईज केवळ एका हाताएवढी होती. मरियमने हे दाखवत सांगितलं की यामुळेच ती ऑनलाईन शॉपिंगवर विश्वास ठेवत नाही, कारण ऑर्डर केल्यावर नक्की काय हाती येईल याचा पत्ता नसतो. तिने लोकांना सल्लाही दिला की सामान खरेदी करताना ते परत करता येईल का, हे पाहून खरेदी करा.
हा व्हिडिओ पाहून लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सवाल उपस्थित केला की यासाठी महिलेनं किती पैसे खर्च केले होते आणि तिचे पैसे तिला परत मिळाले का? तर दुसऱ्या एका व्यक्तीने कमेंट करत म्हटलं की याच कारणामुळे मला ऑनलाईन शॉपिंगवर विश्वास नाही. आणखी एकाने कमेंट करत म्हटलं की मोठी खुर्ची आणि खेळण्यातील खुर्ची याच्या किमतीत बराच फरक असेल. त्यामुळे महिलेला किंमत पाहूनच याचा अंदाज यायला हवा होता.