प्रत्येकालाच आपला राग शांत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण काही लोक हे काही केल्या आपल्या रागावर नियंत्रण मिळवू शकत नाहीत. त्याचा परिणाम काहीतरी भलताच होतो. अशीच एका घटना साउथवेस्ट एअरलाइन्समध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेसोबत घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
फ्लाइट अटेंडंट ज्यांना एअरहोस्टेसही म्हटलं जातं. त्या प्रवाशांच्या सेवेसाठी तिथे असतात. प्रवाशांना आपल्या जागेवर बसण्यापासून ते सीट बेल्ट बांधण्यापर्यंत सर्व गोष्टींची त्या मदत करतात. प्रवाशांच्या छोट्या छोट्या गोष्टींची जबाबदारीही त्यांचीच असते. अशात DNA ने दिलेल्या एका वृत्तानुसार, साउथवेस्ट एअरलाइन्समध्ये प्रवास करत असलेल्या एका महिला प्रवाशाला राग आल्यावर तिने फ्लाइट अटेंडंटच्या चेहऱ्यावर बुक्की मारली. (हे पण वाचा : अखेर विमानात जास्त महिलांचाच स्टाफ का असतो? फारच इंटरेस्टींग आहे यामागचं कारण....)
महिलेने मारलेल्या बुक्क्या इतक्या जोरदार होत्या की, यात एअर होस्टेसचे दात तुटले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, साउथेवस्ट एअरलाइन्सची फ्लाइट डेस्टिनेशनला लॅंड होणार होती. अशात एअर होस्टेसने २८ वर्षीय महिलेला सीट बेल्ट बांधण्याची विनंती केली. यावर नाराज होऊन महिलेने एअर होस्टेसवर बुक्क्यांचा मारा केला. ज्यात एअर होस्टेसचे दात तुटले. तिच्या चेहऱ्यावरही जखम झाली आहे.
फ्लाइट एअरपोर्टवर लॅंड होताच मारहाण करणाऱ्या महिला पॅसेंजरला अटक करण्यात आली आहे. इतकंच नाही तर साउथवेस्ट एअरलाइन्सने विवियाना क्विनोनेज नावाच्या या महिलेला भविष्यात आपल्या फ्लाइटने प्रवास करण्यावर बंदी घातली आहे.