Female Prison Gaurd Helps Prisoner To Escape From Jail: अमेरिका (US) एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. इथे हत्येच्या आरोपात तुरूंगात कैद असलेल्या कैद्याने तुरूंगातील एका महिला गार्डला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि नंतर तिच्या मदतीने तो तुरूंगातून फरार झाला. या घटनेनंतर महिला गार्डने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी नंतर तुरूंगातून पळालेल्या कैद्याला पुन्हा पकडलं.
'डेली मेल' मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, पोलिसांनी ११ दिवसांपर्यंत कैद्याचा शोध घेतला तेव्हा तो पुन्हा पकडला गेला. ज्या महिला गार्डला त्याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं तिने स्वत:वर गोळी झाडत जीवन संपवलं. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचं निधन झालं.
महिला गार्डने तुरूंग प्रशासनाला सांगितलं होतं की, कैद्याची मानसिक स्थिती ठिक नाही. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. अशाप्रकारे तिने कैद्याला तुरूंगातून बाहेर निघण्यासाठी मदत केली. ती कैद्याला उपचारासाठी म्हणून बाहेर घेऊन गेली. महिला गार्डने गेल्या २९ एप्रिलला हा कारनामा केला.
दरम्यान पोलीस सतत महिला गार्ड आणि तुरूंगातून पळालेल्या कैद्याचा शोध घेत होते. नंतर महिला गार्ड एका स्टोरमध्ये कपड्यांची खरेदी करताना दिसून आली. त्यानंतर ती हॉटेलमध्ये गेली, जिथे कैदी होता. तिला पाठलाग करत पोलिसही तिथे पोहोचले. कैदी आणि महिला गार्डला पोलीस पकडणारच होते की, अटकेच्या भीतीने महिलेने स्वत:वर गोळी झाडली. तर पोलिसांनी कैद्याला अटक केली.
असं सांगितलं जात आहे की, अमेरिकेच्या अलबामा तुरूंगा कैदी कैद होता. इथेच महिला गार्ड तैनात होती. यादरम्यान कैद्याने महिला गार्डला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि तिच्या मदतीने तुरूंगातून पळून गेला. या घटनेत पोलिसांनी कैद्याला पुन्हा पकडलं तर महिला गार्डने आत्महत्या केली. तिला भीती होती की, तिच्या विरोधात कारवाई केली जाईल आणि आपल्या लोकांना ती काय सांगणार.