सामान्यपणे आपल्या घरी कुरिअर आलं तर ते आपण स्वत: ऑर्डर केलेलं असतं जर आपण केलं नसेल तर ज्याने केलं त्याने सांगितलं असतं. पण कुणाच्याही घरी जर एखादं अनोळखी कुरिअर आलं तर ते उघडताना कुणालाही भीती वाटेल. त्यात काही चांगलं निघालं तर ठीक नाही तर मग पश्चातापही होतो. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं.
महिेलेने रेडिटवर पोस्ट शेअर करून याबाबत सांगितलं. तिने लिहिलं की, मी 10 महिन्यांआधीच फिलाडेल्फियामध्ये शिफ्ट झाले आणि माझ्या जवळच्या लोकांनाही येथील पूर्ण पत्ता माहीत नाही. पण एक दिवस मी जेव्हा घरी परतले तेव्हा मेलबॉक्समध्ये मला एक कुरिअर मिळालं.
महिला म्हणाली की, मला समजत नव्हतं की, हे मला कुणी पाठवलं. त्यातील एका छोट्या पॅकेटवर माझं लक्ष गेलं तेव्हा मला धक्का बसला. त्यात काही नखं होती. सोबतच चिठ्ठीत लिहिलं होतं की, तुझ्याबाबत विचार करत आहे. नखांसोबत असं लेटर वाचून मी घाबरले. विचार करत होते की, असं कोण मला लिहू शकतं. महिलेने लेटर आणि नखांचा फोटो रेडिटवर शेअर केला आहे. ती म्हणाली की, मी मिडवेस्टला राहते आणि इथे कुणालाच ओळखत नाही.
असं कुरिअर मिळाल्यानंतर महिलेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्राइवेसी सेटिंग्स अपडेट केली आणि सोशल मीडियावर शेअर केलेल फोटोही काढून टाकले. ती म्हणाली की, मी पोलिसात तक्रार दाखल केली, पण त्यांनी यात काही इंटरेस्ट दाखवला नाही. हे कुरिअर मी माझ्या एका कलिगकडे दिलं आहे. पुरावा म्हणून ते ठेवणंही गरजेचं आहे.