वैयक्तीक स्वच्छतेचा भाग म्हणून दात घासण्याची क्रिया सगळेचजण नियमितपणे करतात. सौदी अरेबियामध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका तरूणीच्या पोटात डॉक्टरांना दास घासण्याचा ब्रश आढळून आला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रश गिळलेल्या या महिलेवर मक्का येथील 'ए 1 नूर हॉस्पिटल' मध्ये उपचार सुरू आहेत. पोटातून टूथब्रश काढून टाकल्यानंतर, स्वत: तरूणीने सांगितले की, दात घासत असताना तिनं चुकून ब्रश गिळले.
या तरूणीचे वय २० वर्ष असून आपातकालीन विभागातील डॉक्टरांना या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, दात घासताना या तरूणीने अचानक ब्रश गिळून टाकला. घश्यातून ब्रश थेट पोटात गेला. त्यानंतर लगेचच ही तरूणीने रुग्णालय गाठले. रुग्णालायात दाखल झाल्यानंतर या तरूणीची एक्स रे, सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली होती. उशिर न करता डॉक्टरांनी या महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं.
अवघ्या 20 मिनिटांत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. मोहम्मद फौझी यांच्या पथकाला गॅस्ट्रोकोपीच्या माध्यमातून महिलेच्या पोटातून ब्रथ काढण्यात यश आलं. रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेचे सहाय्यक संचालक डॉ मोतलख अल मालकी यांनी सांगितले की, ब्रश तरुणीच्या पोटातून यशस्वीरित्या काढले गेले आहे आणि आता ती पूर्णपणे निरोगी आहे. बाबो! नियम मोडल्याने पोलिसांनी फाडली लांबच लांब पावती, दंडाची रक्कम पाहून अवाक् व्हाल
अशीच एक घटना रायपूरमध्ये घडली होती. पाच वर्षाच्या मुलाने वर्षभरापुर्वी टुथब्रश गिळला होता पण आई ओरडेल या भीतीने त्याने टुथब्रश गिळल्याचं कोणाला सांगितलच नाही. आपल्या मुलाने टुथब्रश गिळल्याचं त्याच्या घरच्यांना काहीच माहिती नव्हतं. जेवताना आणि लघवी करताना त्रास होऊ लागल्यानंतर अखेर ही गोष्ट लक्षात आली. केशव साहू असं या मुलाचं नाव होतं. अखेर कुटुंबियांनी रायपूर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरकडे धाव घेतली. ऑपरेशन करुन टुथब्रश बाहेर काढण्यात आला होता.
सलाम! दिवसा नोकरी अन् रात्री सायकलवर फूड डिलिव्हरी करून स्वप्नांसाठी राबतोय हा इंजिनिअर
टुथब्रश गिळल्याने केशवला मुतखड्याचा त्रास होऊ लागला. आम्ही 5 सेंमी मुतखडा बाहेर काढला होता. मात्र त्याच्यासोबत असणारी वस्तू नेमकी काय होती हे एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंडमध्ये स्पष्ट होत नव्हतं. मुत्रपिंडातून मुतखडा बाहेर काढला तेव्हा त्याच्यासोबत 15सेंमी मोठी काठीदेखील बाहेर आली होती. रक्ताने माखली असल्याने ते नेमकं काय आहे ? याची माहिती नव्हती. पण नंतर तो टुथब्रश असल्याचं समोर आलं', अशी माहिती रायपूर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर जे पटेल यांनी दिली होती.