आपल्या मुलाला (Son) असलेल्या एका विचित्र आजाराला (Strange disease) त्याची आई (Mother irritated) इतकी वैतागली आहे की आता आपल्याला मुलाची घृणा (Hates boy) वाटत असल्याचं तिनं म्हटलं आहे. प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या पद्धतीनं वाढत असतं. लहानाचं मोठं होण्याचा, शिकण्याचा, समज येण्याचा प्रत्येक मुलाचा वेग हा वेगवेगळा असतो. मात्र अनेकदा इतर मुलांशी तुलना करून पालक स्वतःच्या डोक्यात राख घालून घेत असल्याचं अनेकदा दिसून येतं. मात्र काही वेळा अडचणी इतक्या भयंकर असतात की पालकांच्या सहनशीलतेचा कस लागतो. असाच एक अनुभव एका महिलेनं सध्या सोशल मीडियात शेअर केला आहे.
रेडिट.कॉम या बेवसाईटवर एका महिलेनं आपला अनुभव शेअर केला आहे. आपल्या ६ वर्षांच्या मुलाला आणि शी आणि शू करण्याचं भानच येत नसल्यामुळे ही महिला वैतागली आहे. साधारणतः तिसऱ्या वर्षानंतर मुलांना शी-शूचं भान येतं आणि आपल्याला टॉयलेटमध्ये जायचं असल्याचं ते आईवडिलांना सांगू लागतात. त्यानंतर त्यांना टॉयलेट मॅनर्स शिकवले जातात आणि पाचव्या वर्षापासून मुलं स्वतंत्रपणे टॉयलेटला जाऊन य़ेऊ शकतात. मात्र या महिलेच्या मुलाबाबतीत उलटा प्रवास झाल्याचा अनुभव तिने शेअर केला आहे.
आपल्या मुलाला तिसऱ्या वर्षी टॉयलेटचं भान आल्याचा अनुभव महिलेनं शेअर केला आहे. तिसऱ्या वर्षी आपल्या शी किंवा शू आल्याचं तो सांगायचा. मात्र त्यानंतर पुन्हा तो चड्डीतच सगळे विधी करू लागला. आता तो ६ वर्षांचा झाला तरी त्याला हे भान आलं नसल्यामुळे महिला वैतागली आहे.
मुलाला असलेल्या या आजारामुळे आपण कुठेही बाहेर जाऊ शकत नाही, कुठल्याही समारंभाला हजेरी लावू शकत नाही, अशी खंत तिने व्यक्त केली आहे. मुलाला बरं करण्यासाठी सर्व प्रकारे उपाय केले, मात्र तरीही परिस्थितीत सुधारणा होत नसल्यामुळे महिला वैतागली आहे.