शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

Hidden room : पै पै जमवून महिलेनं अखेर स्वतःचं घर घेतलं; अचानक पायऱ्या बाजूला सरकवताच दिसलं असं काही.....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 3:30 PM

Hidden room inside staircase : जेव्हा महिलेने आपला दरवाजा उघडला तेव्हा तळघरात अंधार होता. तसेच, आतल्या भिंती ओलसर वाटत होत्या.

घर खरेदी करणं प्रत्येकाचे स्वप्न असतं. अनेक वर्षांच्या बचतीनंतर लोक स्वप्नातील घरे खरेदी करतात. परंतु हे घर एखाद्या भयानक स्वप्नासारखे बनले तर काय होईल? अशीच एक घटना समोर आली आहे. @ abi_mia14  नावाच्या  सोशल मीडिया युजरनं हा व्हिड़ीओ शेअर केला आहे.  @ abi_mia14 नावाच्या  सोशल मीडिया युजरसह असेच काहीसे घडले.

वर्षानुवर्षे बचत करून या महिलेने आपले घर विकत घेतले. पण त्यानंतर, त्या महिलेस हे समजले की तिच्या नवीन घराच्या पायऱ्यांखाली दुसर्‍या घरात जाण्याचा मार्ग लपलेला आहे. त्या महिलेला जेव्हा  हे कळलं तेव्हा लगेचच तिनं व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 

महिला नवीन घरात आपले सामान लावत होती. अचानक एक दिवस तिने सफाई करताना पायर्‍यावर ठेवलेला कारपेट काढून टाकला. यानंतर, तिचं लक्ष पायऱ्यांखाली असलेल्या दाराकडे गेले. त्या महिलेने असा दावा केला आहे की कोणीतरी नक्कीच त्याच्या आत राहते. जेव्हा महिलेने आपला दरवाजा उघडला तेव्हा तळघरात अंधार होता. तसेच, आतल्या भिंती ओलसर वाटत होत्या.

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

पायर्‍याच्या आत जाताना महिलेने व्हिडीओ शूट केला. आत भिंतींवर जुनी पेंटिंग्ज होत्या. तसेच बर्‍याच जुन्या वस्तू, कार्पेट्स माळ्यावर पडल्या होत्या. व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळेचजण घाबरून गेले. एकाने या महिलेला  ताबडतोब घर सोडण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी आणखी एकाने लिहिले की, 'जर तो त्या घरात असता तर  पळून गेला असता. सर्वात भयावह बाब म्हणजे तळघराच्या भिंतींवर पंज्याची चिन्हे होती.''

बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो

एबीच्या घराच्या या भागाचे रहस्य अद्याप समोर आले नाही. तथापि, अनेकांचा असा विश्वास आहे की द्वितीय विश्वयुद्धात सैन्याने लपण्यासाठी याचा उपयोग केला असावा. तथापि, बर्‍याच लोकांनी भूतांशीही याचा संबंध लावला.  या महिलेला अनेकांनी अभिनंदन म्हणत ही जागा स्वच्छ करून खेळण्यासाठी वापरता येईल. असा सल्ला दिला आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल