जगभरातून वेगवेगळ्या अजब घटना समोर येत असतात. अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने नॅशनल टेलिव्हिजनवर लोकांना विनंती केली आहे की, त्यांनी तिला तिच्या 8 वर्षांच्या मुलीला तिच्या वडिलांसोबत भेटवण्यात मदत करावी. महिलेला त्या व्यक्तीचा नाव, फोन नंबर आणि पत्ता काहीच माहीत नाही. ज्यामुळे लोकही हैराण झाले आहेत. ही घटना चीनच्या चूंगचींगमधील आहे. महिलेचं नाव फेंग सांगण्यात आलं. ती एका अशा शोमध्ये आली होती जिथे लोक आपल्या हरवलेल्या नातेवाईक आणि मित्रांना भेटवण्यास मदत करतात.
महिला तिच्या मुलीच्या पित्याच्या शोधात निघाली आहे. त्याने तिला 9 वर्षाआधी गर्भवती केलं होतं. त्यानंतर तिने मुलीला जन्म दिला. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, फेंगला केवळ इतकंच आठवतं की, ती जिममध्ये एका व्यक्तीला भेटली होती. इथे त्याने एक आठवडाच काम केलं होतं. तेव्हाच ती तिच्या एका रिलेशनशिपमधून बाहेर येत होती.
नंतर जिममध्ये भेटलेल्या या नव्या व्यक्तीसोबत ती रिलेशनशिपमध्ये आली. हे नातं फार चाललं नाही. दोघांमध्ये भांडण झालं आणि एका आठवड्यातच ब्रेकअप झालं. काही महिन्यांनी फेंगला समजलं की, ती गर्भवती आहे. त्या व्यक्तीला याबाबत काहीच माहीत नव्हतं. तिनेही त्याला काही सांगितलं नाही.
अशात फेंगने गर्भपात करण्याऐवजी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. कारण तिला याचा शरीरावर वाईट प्रभाव पडण्याचा धोका होता. फेंग म्हणाली की, तिला आशा होती की, रिलेशनशिप गंभीर राहील, पण यात घाई झाली. ब्रेकअपही फार लवकर झालं.
तिने सांगितलं की, ती 8 वर्षानंतरही या व्यक्तीचा शोध घेत आहे कारण तिला वाटतं की, आपल्या वडिलांना भेटण्याचा तिच्या मुलीला अधिकार आहे. पण तिला त्या व्यक्तीचं नावही आता आठवत नाही. त्याचा फोन नंबरही तिच्याकडे नाही.
फेंगला केवळ इतकंच आठवतं की, त्याच्या आयडीवर त्याचा पत्ता चूंगचींग इतका होता आणि त्याच्या मित्राचं आइसक्रीमचं दुकान होतं. टीव्ही शो चा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर फेंगला आपल्या प्रयत्नात यश मिळालं. तिला तिच्या मुलीच्या वडिलाचा पत्ता मिळाला. त्याने फेंगला लगेच फोन केला.
आता दोघेही या स्थितीला निट करण्यात आणि मुलीच्या भविष्याबाबत चर्चा करत आहेत. चीनमध्ये सध्या या घटनेची चर्चा होत आहे.