आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचं गंभीर आजाराने निधन झालं तर आपण खचून जातो. पण काही लोक यातून बाहेर पडतात. इतकंच नाही तर इतरांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करतात. असंच अमेरिकेतील एका महिलेने केलं. अँजेला टॉर्टोरिस (Angela Tortoris) या महिलेच्या पतीचं गंभीर आजाराने निधन झालं. त्यानंतर अँजेला टॉर्टोरिसने आपल्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली. तब्बल ४२ हजार किलोमीटर धावली. यातून तिने आरोग्याबाबत जनजागृतीही केली. तिच्या कृतीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) नोंद केली गेली. अँजेला टॉर्टोरिस या महिलेने २०१३ मध्ये अँजेलाने १२९ मॅरेथॉनमध्ये (Marathon) सहभाग घेतला. एका वर्षात सर्वाधिक मॅरेथॉन धावणारी महिला म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं. ही महिला आतापर्यंत अमेरिकेतील जवळपास सगळ्या राज्यात किमान ५ वेळा मॅरेथॉन धावली आहे.
पतीच्या निधनानंतर ती तब्बल ४२ हजार किलोमीटर धावली, गिनीज रेकॉर्ड करत दिला अनोखा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 5:59 PM