Woman Embracing Her Facial Hair: जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात आणि त्यांना त्यांचे विचार आहेत. ज्याद्वारे ते त्यांच्या समस्या दूर करतात. काही लोक एका छोट्या समस्येमुळे हैराण होतात. तर काही लोक मोठमोठ्या समस्या सहजपणे सॉल्व करतात. अशाच एका महिलेने तिच्या चेहऱ्यावरील अनावश्यक केसांना आपली स्टाइल स्टेटमेंट केलं आहे.
अमेरिकेच्या लास वेगासमध्ये राहणारी डेकोटा कुक नावाची महिला 13 वर्षांची असतानापासून तिच्या चेहऱ्यावर जाड जाड केस येत होते. ते लपवण्यासाठी ती दिवसातून दोन वेळा शेविंग आणि महिन्यातून एकदा वॅक्स करत होती. पण नंतर तिने यात बदल केला आणि दाढी वाढवून राहू लागली. ती आता ना वॅक्स करत ना त्यावर रेजरचा वापर करत.
30 वर्षीय डेकोटा कुक साइढ शो परफॉर्मर आहे. पण ती नेहमीच इतकी कॉन्फिडन्ट नव्हती. 13 वर्षांची असताना तिने पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर केस राहिले होते. ती या केसांमुळे खूप वैतागली होती आणि आयुष्यातील 10 वर्ष तिने तणावात आणि डिप्रेशनमध्ये घालवले. ती अनेक वर्ष आठवड्यातून एकदा वॅक्स करत होती आणि दिवसातून दोनदा शेविंग करत होती. डेली स्टारनुसार, सगळे लोक तिच्या चेहऱ्यावरील केसांबाबत बोलत होते. याचं तिला फार टेंशन येत होतं.
डेकोटाने केसांसाठी अनेक टेस्ट केल्या आणि अनेक डॉक्टरांना भेटली. पण याचं मुख्य कारण समजून आलं नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं की, तिचे टेस्टॉस्टेरॉन हॉर्मोन वाढल्याने असं झालं आहे. डेकोटोने नियमित शेव केल्याने तिच्या चेहऱ्यावर डाग आणि जखमा झाल्या होत्या. तिची त्वचा जळजळ करत होती. 2015 मध्ये तिने तिच्या एका मैत्रिणीच्या सल्ल्याने शो करणं सुरू केलं. काही दिवस हे अजब वाटलं, पण नंतर तिला सामान्य वाटू लागलं. आता ती इतरांना प्रेरित करते आणि स्वत:ही सकारात्मक जगते.