पालकत्वाची प्रक्रिया (Parenting Process) हा एक प्रकारचा प्रयोग असतो, असं म्हटलं जातं. ज्याला जे योग्य वाटतं त्याप्रमाणे तो आपल्या मुलांना शिकवतो आणि चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टींपासून मुलांना दूर ठेवतो. एखाद्या आई-वडिलांना आपल्या मुलाला एक गोष्ट शिकवणं बरोबर वाटत असलं तरी दुसऱ्या पालकांना ते चुकीचंही वाटू शकतं. अशावेळी अनेकदा पालकांना लोकांच्या टीकेचा सामना करावा लागतो. सध्या असंच काहीसं एका महिलेसोबतही घडत आहे. तिला यासाठी सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे कारण ती आपल्या मुलांसमोर निर्वस्त्र राहाते (Woman Remains Naked in front of Kids).
द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, पेज व्हिटनी नावाच्या महिलेनं नुकतंच एक व्हिडिओ आपल्या टिकटॉक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यात तिने हैराण करणारी गोष्ट सांगितली. महिलेची ही गोष्ट ऐकून लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
पेजने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तिला २ सावत्र मुलं आहेत. मोठ्या मुलाचं वय तीन वर्ष आहे तर लहान मुलाचं वय १ वर्ष आहे. ती दोन्ही मुलांसमोर विनाकपडेच राहाते (Step Mother Remains Naked in front of Kids). तिने सांगितलं की असं खूपच कमी वेळा होतं, की मुलांसमोरही ती कपडे घालून वावरते. महिलेनं ट्रोल झाल्यानंतर वेबसाईटसोबत बोलताना स्पष्ट केलं की तिची मुलं इतकी लहान आहे की ते मानवी शरीरावर त्याप्रकारे बघत नाहीत, जसं इतर लोक बघतात. त्यामुळे त्यांच्यासमोर कपडे न घातल्याने काहीही समस्या नसते.
महिलेनं आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तिने असा विचार केला की जेव्हा मुलं पाच वर्षाची होतील तेव्हा ती त्यांच्यासमोर कपडे घालून वावरायला सुरुवात करेल. कारण तेव्हा ते प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करू लागतील. तिने म्हटलं की मोठं झाल्यावर माझ्या कपडे न घालण्याने त्यांना काही अडचण वाटली तर ते स्वतः मला याबद्दल सांगतील आणि मी कपडे घालू लागेल. महिलेनं सांगितलं की मुलं अजून इतकी लहान आहेत की त्यांना याची समजच नाही की कपडे काय असतात आणि शरीरात लपवण्यासारखं काय असतं. मात्र, महिलेनं इतकं स्पष्टीकरण देऊनही सोशल मीडियावर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.
अनेक पालकांनी म्हटलं की जर ही तिची मुलं असती तर तिने असं कधीच केलं नसतं. तर काहींनी हे कृत्य चुकीचं असून मुलांसमोर न करण्याचा सल्ला दिला आहे. काहींनी महिलेला ट्रोल केलं आहे तर काहींनी तिची बाजू घेतली आहे. एकाने म्हटलं की ती आई असण्यासोबतच एक माणूसही आहे. तिला जे करू वाटेल, ते ती करू शकते. तर आणखी एकाने म्हटलं की आपण मुलांना हे शिकवायला हवं की आपल्या शरीराबाबत कशाप्रकारे कमफर्टेबल राहावं.