(Image Credit : news.yahoo.com)
मॉल किंवा स्टोरमधून वस्तू चोरी करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात. अनेक चोऱ्यांच्या बातम्याही येत असतात. पण अमेरिकेच्या टेक्सासमधील एका महिला चोराने कमालच केली. या महिलेला चोरी करण्याबाबत इतका दंड ठोठावण्यात आला आहे की, जगभरातील चोर चोरी करण्याआधी दहा वेळा विचार करतील. या महिलेला चोरी केल्याप्रकरणी २७ कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.
या महिलेचं नाव Kim Richardson असून तिचं वय ६३ वर्षे आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, या महिलेने वेगवेगळ्या स्टोरमधून अनेक वस्तू चोरी केल्या. २००० सालापासून ते २०१९ पर्यंत अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरात ती गेली होती. तेथील स्टोरमध्ये जाऊन ती वस्तू चोरी करायची. ती या चोरीत इतकी एक्सपर्ट झाली होती की, सिक्युरिटी डिवाइस डिसेबल करणंही तिला येत होतं. (५ वर्ष ज्या ऑफिसमध्ये झाडू मारत होती महिला, आज झाली त्याच ठिकाणी बॉस...)
या चोरीचा तपास प्रसिद्ध तपाय यंत्रणा एफबीआयने केला. त्यांनी सांगितले की, किम स्टोरमधून चोरी केलेल्या वस्तू ऑनलाइन विकत होती. ती या वस्तू पुन्हा पॅक करत होती आणि पूर्णपणे नवीन करून लोकांना विकत होती. लोक तिला यासाठी ऑनलाइन पेमेंट करत होते. आतापर्यंत तिने ३.८ मिलियन डॉलरच्या वस्तू ऑनलाइन विकल्या आहेत. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम २७ कोटी रूपये इतकी होते. आता ही सगळी रक्कम दंड म्हणून तिला परत करायची आहे. सोबतच तिला ३ वर्षांच्या तुरूंगावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. (...अन् क्षणात आजोबा झाले लखपती, Pizza Delivery साठी टिप म्हणून मिळाले तब्बल 9 लाख)