बरेच लोक ऑफिसमध्ये रोज जातात भरपूर काम करतात आणि महिन्याला पगार घेतात. पण काही लोक असेही असतात जे रोज ऑफिसला जातात आणि कामही न करता त्यांना पगार मिळतो. हे काही लोकांना आवडतं तर काही लोकांच्या विचारात बसत नाही. असंच काहीसं एका महिलेबाबत झालं आहे. फ्रान्समध्ये राहणाऱ्या एका महिलेने दावा केला आहे की, तिच्या आरोग्यासंबंधी कारणांमुळे तिला ऑफिसमध्ये कुणीही काही काम देत नाही.
लोक ऑफिसमध्ये काम करून करून हैराण झालेले असतात. ते अनेकदा जास्त कामाच्या तक्रारी करतात. पण ही महिला काम मिळत नाही म्हणून हैराण आहे. इतकंच नाही तर या महिलेने कंपनीवर केस दाखल केली आहे. कारण तिला ऑफिसमध्ये कुणीही काम देत नाही. हे आजकाल नाही तर गेल्या २० वर्षापासून सुरू आहे.
'ऑफिसमध्ये कुणी देत नाही काम'
लॉरेंस वॅन वॅसेनहोव नावाच्या महिलेने आरोप केला आहे की, ती एक सरकारी नोकरी करते आणि फ्रान्स टेलिकॉममध्ये १९९३ मध्ये नोकरीला लागली होती. महिलेला काही काळासाठी हात आणि चेहऱ्यावर पॅरालिसिस अटॅक आला होता. तसेच तिला जन्मापासून फिट येत होती. अशात तिची स्थिती बघता तिच्या सोयीनुसार तिला काम देण्यात आलं होतं. २००२ पर्यंत सगळं काही ठीक सुरू होतं. पण तिची दुसऱ्या ऑफिसमध्ये बदली करण्यात आली होती. तोपर्यंत गोष्टी बदलल्या होत्या. फ्रान्सची टेलिकॉम कंपनी ऑरेंज नावाच्या दुसऱ्या कंपनीने खरेदी केली होती. ज्यात महिलेली तिच्या समस्यांनुसार काम पोजिशन देण्यात आली नाही. पण तिला गेल्या २० वर्षापासून पगार दर महिन्याला मिळत होता.
कोर्टात गेली महिला
महिलेने तिच्या वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत हा मुद्दा पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. पण काही फायदा झाला नाही. अशात महिलेने कंपनीवर केस दाखल केली. महिलेच्या वकिलाने सांगितलं की, कंपनी तिला कामाचा पगार देण्याऐवजी काही काम न करण्याचा पगार देत आहे. महिलेचा दावा आहे की, अशाप्रकारे तिला नोकरी सोडण्यासाठी भाग पाडलं जात आहे. कंपनीवर तिला नैतिक अनादर आणि भेदभाव करण्याचा आरोप केला आहे. तेच कंपनीचं म्हणणं आहे की, ते महिलांसाठी चांगलं वर्क कल्चर देतात.