आमीर खानचा सिनेमा 'गजनी'मध्ये त्याने एका अशा व्यक्तीची भूमिका सााकारली होती ज्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉसची समस्या आहे. ही व्यक्ती दर १५ मिनिटांनी गोष्टी पूर्णपणे विसरतो. २१ वर्षीय टिकटॉकरचीही तशीच कहाणी आहे. मेगन जॅक्सन नावाची ही तरूणी एका दुर्मीळ कंडीशनमधून जात आहे. ज्यामुळे तिला पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमद्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
मेगनला पाच वर्षांआधी फंक्शनल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर झाला होता. मेगन जेव्हाही उत्साहीत होते, जोरात हसते आणि मोठा आवाज ऐकते तेव्हा तिची सर्व मेमरी लॉस होते. ही मेमरी लॉस काही तासांसाठी होते. इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशायरमध्ये राहणारी मेगन सांगते की, या डिसऑर्डरमुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. या समस्येमुळे मेगनला तिच्या लेस्बियन पार्टनरसंबंधी गोष्टी लिहून ठेवाव्या लागतात. कारण ती त्या गोष्टी विसरून जाते.
मेगन सांगते की, ती कधी कधी तिच्या गर्लफ्रेन्डला विसरून जाते. कधी कधी असं होतं की, ती तिच्या परिवारातील सदस्यांनाही विसरून जाते. काही तासांनंतर ती सामान्य होते. यामुळे तिला खूप सारा मानसिक तणावही होतो. त्यासोबतच अनेकदा ती बाजारातून असे पदार्थ घेऊन येते जे तिला अजिबात पसंत नसतात. यावर होत असलेल्या खर्चामुळेही ती हैराण आहे.
मेगन या स्थितीमुळे तिच्या रिलेशनशिपमध्ये अनेक अडचणी आल्या. मेगनची गर्लफ्रेन्ड तारा तिच्यासाठी कोणत्याही प्रकारचं सरप्राइज प्लॅन करत नाही. कारण याने मेगनची कंडीशन बिघडू शकते. मेगन म्हणाली की, गेल्या काही महिन्यांपासून आम्ही डेट करत आहो. पण तिला खूप सहन करावं लागलं आहे. मी कमीत कमी चार वेळा माझ्या गर्लफ्रेन्डला विसरले आहे.
मेगन म्हणाली की, माझी गर्लफ्रेन्ड माझी खूप काळजी घेते. ती माझ्यासाठी रोज डायरी लिहिते. हे पूर्णपणे ५० फर्स्ट डेट सिनेमासारखं आहे. कधी कधी असं होतं की, कुणीतरी समोर येऊन सांगतं की, ही तुझी गर्लफ्रेन्ड तारा आहे. हे ऐकून मी हैराण होते. मला वाटतं मी लेस्बियन नाहीच. अशा परिस्थितीतही माझी गर्लफ्रेन्ड फार सपोर्टिव आहे.