दोन मुलांच्या आईला कोणत्याही परिस्थितीत वजन कमी करायचे होते. तसेच, तिला स्वत:चा लुकही बदलायचा होता. मात्र पैशांअभावी ती त्रस्त होती. अखेर तिने 10 लाखांचे कर्ज घेतले आणि स्वत:वर शस्त्रक्रिया करून वजन आणि लूक बदलला.
'द सन'च्या वृत्तानुसार, सेना मिशेल क्लेमेंट्स 28 वर्षांची आहे. ती ब्रिटनच्या सरे येथील रहिवाशी आहे. लठ्ठपणामुळे तिचे वजन 110 किलोच्या जवळपास गेले होते. मिशेलने मेकओव्हरसाठी जवळपास 19 लाख रुपये खर्च केले. तसेच, मिशेलने आपल्या होणाऱ्या पतीचे खुलेपणाने कौतुक केले आहे, ज्याने तिला वजन कमी करण्यास प्रोत्साहित केले.
मिशेल ब्रिटनच्या हेल्थ सर्व्हिसमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर आहे. वजन कमी करण्यासाठी तिने सुरुवातीला डाएट कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खाण्याच्या सवयीमुळे डाएटवर कंट्रोल करता येत नव्हता. जून 2021 मध्ये मिशेलने वजन कमी करण्याचा आणि शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तिने जवळपास दहा लाख रुपयांचे कर्ज होते. त्यानंतर तिने ब्रेस्ट प्रक्रियेसाठी सुमारे नऊ लाख रुपये खर्च केले, एकूण खर्च 19 लाख रुपयांच्या जवळ आला. आता मिशेलचे वजन 66 किलोच्या जवळपास पोहोचले आहे.
मिशेल हिने सांगितले की, "खर्च केलेला पैसा जास्त आहे. पण स्वतःवर खर्च करण्यापेक्षा काहीही चांगले नाही. लोकांना वाटते की शस्त्रक्रिया करणे हे एक आळशी काम आहे आणि ते फसवणूक करण्याचा प्रकार आहे, परंतु ते सोपे नाही. शस्त्रक्रियेच्या एका दिवसानंतर मला रक्ताच्या गुठळ्या उलट्या होत होत्या, असे वाटत होते की मी मरेन."
याचबरोबर, मी माझ्या भल्यासाठी खाद्यपदार्थांशी असलेले नाते बदलले, जे खूप कठीण होते. अनेकांनी मला सांगितले की जास्त व्यायाम करावे आणि कमी खावे, परंतु ही मानसिकता बदलणे खूप कठीण काम होते. कोल्ड्रिंक्स पिण्यापासून, स्नॅक्स खाण्यापासून मी स्वतःला रोखू शकली नाही.गेल्या काही वर्षांत असे क्वचितच घडले आहे की, मी आनंदी राहू शकली आहे, असे मिशेलने म्हटले आहे.
दरम्यान, एक चांगली आई होण्यासाठी मिशेलने वजन कमी करायला सुरुवात केली. मिशेलला दोन मुली आहेत. एमिलिया 5 वर्षांची आहे आणि इस्ला 1 वर्षांची आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये तिची शस्त्रक्रिया झाली.