लग्नानंतर कपलला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ज्याने त्यांचं चांगलं रहावं आणि त्यांना काही अडचणी येऊ नये. पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींमुळे नात्यात दरी निर्माण होते. आणि मग ते नातं परत रूळावर आणणं अवघड होऊन बसतं. अशात नातं सुधारण्यासाठी पती-पत्नीला काही तडजोड करावी लागते. अशीच एक घटना चर्चेचा विषय बनली आहे. पण यात एक अजब बाब आहे. एका महिलेने आपलं लग्न वाचवण्यासाठी असं काही काम केलं, जे फारच विचित्र आहे.
महिलेने तिचं लग्न वाचवण्यासाठी आपल्या तोंडावर टेप लावणं सुरू केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेन नावाच्या महिलेला हेवी ब्रीदिंगची समस्या होती. ज्यामुळे ती नाकाऐवजी तोंडाने श्वास घेत होती. भलेही ती बसलेली असो वा उभी असो किंवा चालत-फिरत असो ती तोंडाने श्वास घेत होती. अशात श्वास घेताना आवाज जास्त होत होता. ज्यामुळे तिचा पती परेशान होता.
जेननुसार, ती थोडं अंतर पायी चालली तर तिला थकवा येत होता. इतकंच काय तर रात्री झोपताना तिचं तोंड उघडं राहत होतं. ती जोरजोरात घोरायला लागत होती. आता तिची ही समस्या तिच्या पतीसाठी समस्या बनली होती. या समस्येमुळे जेनचं लग्नही धोक्यात येऊ लागलं होतं. ही समस्या दूर करण्यासाठी जेनने एक अजब उपाय शोधला.
रिपोर्ट्सनुसार, जेनने तिच्या तोंडावर टेप लावणं सुरू केलं. जेणेकरून तिला नाकाने श्वास घेण्याची प्रॅक्टिस करता यावी. ती केवळ झोपतानाच नाही तर कुठे बाहेर गेल्यावरही तोंडावर टेप आवर्जून लावत होती. मुलांना शाळेत सोडायला जाणं असो वा दुकानातून वस्तू आणायची असो, बाहेर जाण्याआधी ती तिच्या तोडांवर टेप लावत होती. त्यासोबतच ती दिवसभर फार कमी बोलत होती.
जेनला टेप लावण्याचा फायदा मिळाला. आता ती हळूहळू तोंडाऐवजी नाकाने श्वास घेऊ लागली आहे. इतकंच काय तर तिचे रात्रीचं घोरणंही कमी झालं आहे. तिची सतत धापा टाकण्याची समस्याही हळूहळू दूर होत आहे.