शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
7
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
8
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
9
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
10
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
11
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
12
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
13
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
14
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
15
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
16
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
17
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
18
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
19
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
20
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'

दोन वर्षांपासून ज्या बॉयफ्रेन्डला मृत समजत होती, तो दुसऱ्या शहरात अचानक आढळला आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 1:07 PM

जरा असा विचार करा की, एखादी व्यक्ती तुमच्यासाठी सगळं काही होते. त्या व्यक्तीसोबत आयुष्य जगण्याचे तुम्ही स्वप्न बघता आणि एक दिवस तुम्हाला बातमी मिळते की, ती व्यक्ती आता या जगात नाही.

(Image Credit : videohive.net)(फोटो सांकेतिक)

जरा असा विचार करा की, एखादी व्यक्ती तुमच्यासाठी सगळं काही होते. त्या व्यक्तीसोबत आयुष्य जगण्याचे तुम्ही स्वप्न बघता आणि एक दिवस तुम्हाला बातमी मिळते की, ती व्यक्ती आता या जगात नाही. दु:खात दोन वर्षे निघून जाता आणि अचानक पुन्हा ती व्यक्ती तुमच्या समोर येते. पण ती व्यक्ती तुम्हाला भेटतही नाही आणि ओळखतही नाही. काय कराल तुम्ही?

पबमध्ये शेफ होता 'तो'

मेट्रो यूकेच्या  एका वृत्तानुसार, एका तरूणीसोबत असंच झालं. तिला २ वर्षांआधी तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डच्या निधनाची बातमी कळाली होती. पण तिने त्याला पुन्हा पाहिले तेही जिवंत. ही घटना घडली ती रेचल सोबत. ऑस्ट्रेलियातील रेचल २ वर्षांआधी १८ वर्षांची होती. ती पबमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरूणाला डेट करत होती. दोघांचंही चांगलं सुरू होतं.

हात मोडला अन् त्याने पैसे उधार घेतले

साधारण ३ महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर एका दिवस तरूणाने रेचलला संगितले की, त्याची नोकरी गेली. एका अपघातात त्याचा हात मोडला. म्हणजे तो आता पबमध्ये जेवण तयार करू शकणार नाही. त्यामुळे त्याने रेचलकडून ७० हजार रूपये उधार घेतले. त्यातील २५ हजार त्याने नंतर तिला परतही केले. पण एक दिवस अचानक त्याने फोन कॉल्स आणि मेसेजेसना रिप्लाय देणं बंद केलं.

काही रिप्लाय करत नव्हता

रेचलने सांगितले की, सगळं काही अचानक झालं. त्याने फोन करणं बंद केलं. मेसेजला रिप्लायही देत नव्हता. हे सगळं फारच विचित्र घडत होतं. तो गायब झाला होता. विचारपूस केल्यावर कुठूनतरी तिला माहिती मिळाली की, तो क्वींसलॅन्डच्या रिहॅब सेंटरमध्ये आहे. असंही कळालं की, त्याने मित्रांकडूनही पैसे उधार घेतले होते.

आईने सांगितले मुलाची हत्या झाली

एक दिवस रेचलला तरूणाच्या मित्राने सांगितले की, तो आता या जगात नाही. या मित्राला त्या तरूणाच्या आईने फोन करून ही माहिती दिली होती. त्याच्या आईने असंही सांगितलं होतं की, एका गॅंगकडून त्याने पैसे घेतले होते,  जे तो परत करू शकला नाही. या गॅंगच्या लोकांनी त्याचा हत्या केली.

दोन वर्षांनी तो दिसला

रेचल आतून तुटली होती. हळूहळू रेचलनेही विश्वास ठेवला की, त्यांचा साथ इतक्याच दिवसांचा होता. पण दोन वर्षानंतर रेचलने त्याला दुसऱ्या शहरातील एका रेस्टॉरन्टमध्ये पाहिले आणि तिला धक्का बसला. रेचलने सांगितले की, 'मी माझ्या मित्रांसोबत एका फॅमिली रेस्टॉरन्टमध्ये गेले होते. तो दुसऱ्या रेस्टॉरन्टमध्ये होता. मी त्याला पाहिलं, तो जिवंत होता'.

तरूणाच्या आईचा रेचलला फोन

अर्थातच त्याला पाहिल्यावर रेचलने त्याला भेटण्याचा प्रयत्न केला. पण तरूणाने तिला भेटण्यास नकार दिला. हॉटेलच्या मॅनेजरने त्या तरूणाचं नावही वेगळं सांगितलं होतं. हे इथंच थांबलं नाही. त्याच रात्री रेचलला त्या तरूणाच्या आईचा फोन आला. ती म्हणाली की, माझ्या मुलाला रेस्टॉरन्टमधून काढलं गेलं. यासाठी रेचल जबाबदार आहे. कारण तिच्यामुळेच रेस्टॉरन्टमध्ये गोंधळ झाला होता'.

तो भेटला पण ओळखण्यास दिला नकार

रेचलने सांगितले की, 'माझ्या हे लक्षात येत नव्हतं की, नेमकं काय होतंय. मला फक्त त्याला एकदा भेटायचं होतं आणि त्याला काही प्रश्न विचारायचे होते. काही दिवसांनी मी त्या परिसरात पुन्हा गेले. यावेळी तो मला भेटला. पण त्याने मला ओळखण्यास नकार दिला'. रेचलनुसार, या घटनेुमुळे ती फारच दुखावली गेली. तरूणाला काही अडचण व्हावी असं तिला अजिबात वाटत नव्हतं. त्यामुळे तिने त्याचं नाव न घेता या घटनेची पोस्ट लिहिली'.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाJara hatkeजरा हटके