अमेरिकेच्या अलास्कामधील ही घटना आहे. इथे एक महिला टॉयलेटमध्ये होती. तेव्हा तिच्यावर अस्वलाने हल्ला केला.अलास्कामधील अस्वलांची गणती जगातल्या सर्वात घातक अस्वलांमध्ये केली जाते. गेल्या आठवड्यातील Chilkat Lake ची ही घटना आहे. Shannon Shevens ही इथे वॉशरूम यूज करत होती. तेव्हाच ही घटना घडली.
बीबीसीच्या वृत्तानुसार, मिस स्टीवन्स टॉयलेटला गेल्या आणि थोड्या वेळात आतून ओरडण्याचा आवाज आला. जेव्हा तिचा भाऊ आत गेला तर त्याला टॉयलेटच्या होलमध्ये अस्वलाचं तोंड दिसलं. आत अंधार होता. अस्वलाने तेथून तिच्यावर हल्ला केला.
स्टीवन्स म्हणाली की, अस्वलाने तिच्यावर एकतर पंजाने हल्ला केला नाही तर चावा घेतला. ती आपल्या भावासोबत आणि त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत एका दूरच्या परिसरात यार्टमध्ये राहण्यासाठी गेली होती. तिने सांगितले की, एका रात्री आधीच त्यांनी खुल्या जंगलात जेवण तयार केलं होतं.
न्यूज एजन्सी एपीला स्टीवन्सने सांगितले की, ती जशी टॉयलेटला बसली, तसंच अस्वलाने तिला चावा घेतला. ती जोरात ओरडू लागली होती. इतक्यात तिला भाऊ बॅटरी घेऊन आला. तिने टॉयलेटकडे इशारा केला. नंतर दोघेही बाहेर आले. नंतर ते लाइट येण्याची वाट बघू लागले. नंतर तिला फर्स्ट एड देण्यात आलं.
अलास्का डिपार्टमेंट ऑफ फिश अॅन्ड गेम बायोलॉजिस्टचे Carl Koch यांच्यानुसार, 'ती पहिली अशी महिला आहे जिच्यासोबत अशी घटना घडली'. त्यांचं मत आहे की, याची जास्त शक्यता आहे की, अस्वल काळा असावा. अलास्कामध्ये ग्रिजली बेअरही आढळून येतात.