व्हर्जिनिया - आयुष्यात एकदा तरी मोठ्या रकमेची लॉटरी लागावी असावं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे कित्येकांना लॉटरी काढण्याचं जणु व्यसनच लागतं. या लॉटरीच्या तिकिटांमध्येच कित्येकांचे हजारो रुपये खर्च झालेले आहेत. तरीही एकदाच मोठी रक्कम मिळावी याकरता लॉटरीप्रेमी लॉटरी काढतातच. त्यात फार कमी लोकांना यश मिळतं. म्हणजे लॉटरीच्या बाबतीत फार कमी लोक भाग्यवान ठरतात. युएसमध्ये राहणाऱ्या ब्रेंडा जेंट्री यांना एक-दोन नव्हे तर तब्बल तीनवेळा लॉटरी लागली आहेत. तीनही लॉटरी काही आठवड्यांच्या कालावधीतच लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या लॉटरीमधून ब्रेंडा यांना तब्बल ५ मिलिअन डॉलर मिळाले आहेत.
व्हर्जिनिया येथे राहणारी ब्रेंडा जेंट्री यांना सुरुवातीला ५ हजार डॉलर (३ लाख २६ हजार ७७५) नंतर ५०० डॉलर (३२ हजार ६६०) आणि मग थेट ५ मिलिअन डॉलर (३२ कोटी ६६ लाख ३७ हजार ५००) रुपयांची लॉटरी लागलीय. व्हर्जिनिया येथील लॉटरी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ब्रेंडा यांनी ‘५० एक्स मनी’ ही लॉटरी काढली होती. ब्रेंडा यांनी ही लॉटरी त्यांनी स्क्रॅच केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. आयुष्यात एका झटक्यात बदल व्हावा यासाठी लोक लॉटरी काढतात. पण प्रत्येकाला लॉटरी लागेलच असं नसतं. फार कमी लोकांना आजवर मोठ्या रक्कमेची लॉटरी लागली आहे. मात्र सलग काही आठवड्यांच्या अंतराने तीन वेळा लॉटरी लागलेल्या ब्रेंडा या पहिल्याच असतील.
आणखी वाचा - मालकाने बेवारस सोडून दिल्याने कुत्रीने सोडला प्राण
ही रक्कम घेण्यासाठी ब्रेंडा यांच्याकडे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ३० वर्षांच्या कावाधीत दर महिन्याला एक ठराविक रक्कम कंपनीकडून घ्यायची किंवा एकाचवेळी ही सगळी रक्कम स्विकारायची. नुकताच त्यांनी ५ मिलिअन डॉलरचा चेक स्विकारला आहे. साहजिकच एवढ्या मोठ्या रकमेने कोणाचंही आयुष्य एका क्षणात बदलू शकतं. त्यामुळे ब्रेंडा यांच्या आयुष्यातही मोठा बदल होणार आहे. कित्येक लोक लॉटरीचं तिकिट काढतात. मात्र त्यात ते भाग्यवान ठरत नाहीत. त्यामुळे अनेकांनी लॉटरीचं तिकिट घेण्याचं प्रमाण कमी केलंय. पण ब्रेंडा यांना सलग तीनवेळा लागलेल्या लॉटरीचं तिकिट घेण्याचं प्रमाण आता वाढण्याची शक्यता आहे.
सौजन्य - firenewsfeed.com