अनेकदा आपल्यासोबत असं काही होतं की, आपण आपल्या शरीरात होणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो. या गोष्टींना आपण समस्या समजतच नाही. पण जेव्हा मोठं काही घडतं तेव्हा सगळेच हैराण होतात. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं. तिच्या घशात काहीतरी समस्या झाली होती. आधी तर तिने दुर्लक्ष केलं. पण जेव्हा डॉक्टरांकडे गेली, तेव्हा जे काही समोर आलं ते ऐकून ती हैराण झाली.
ही घटना अमेरिकेच्या इलिनॉइसची आहे. इथे राहणाऱ्या एका महिलेच्या घशात वेदना आणि सूज होती. ज्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली. कातेलिन येत्म असं नाव असलेल्या महिलेसोबत असं काही झालं ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती. महिलेला वाटलं घशात इन्फेक्शन झालं असेल, पण समोर वेगळंच सत्य आहे.
कातेलिन येत्सने 'टुडे'सोबत बोलताना सांगितलं की, ती घशात वेदना होत असल्याने डॉक्टरांकडे गेली होती. इथे डॉक्टरांनी तिचं चेकअप केलं आणि नंतर एक्स-रे काढण्यास सांगितला. एक्स-रेमध्ये रेडिएशनचा धोका असतो. त्यामुळे त्यांनी तिला आधी प्रेग्नेन्सी टेस्ट करण्यास सांगितलं. हैराण करणारी बाब म्हणजे तिची प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण तिची एचसीजी लेव्हल खूप जास्त होती. ज्याचा अर्थ हा होता की, तिच्या गर्भात एकापेक्षा जास्त बाळ आहेत.
४ बाळांना दिला जन्म
आधी तर येत्सला वाटलं की, तिच्याशी गंमत करण्यात आली आहे. पण लवकर तिच्या प्रेग्नन्सीची लक्षण दिसू लागली. पण तिची एचसीजी लेव्हल अजूनही हाय होती. २० आठवड्यांनी तिची समस्या वाढली. तिला ब्लड प्रेशर, श्वास घेण्यास समस्या, लिव्हर-किडनीची समस्या होऊ लागली. शेवटी येत्सने सी सेक्शनच्या माध्यमातून २८ आठवडे आणि चार दिवसांनी चार बाळांना जन्म दिला. तिची चारही बाळं निरोगी आहे.