सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे, जे एका पत्नीने तिच्या पतीच्या बॉसला लिहिले आहे. पतीचे वर्क फ्रॉम होम बंद करून त्यांना पुन्हा ऑफिसला बोलावा, अशी विनंती पत्नीने पतीच्या बॉसला या पत्रात केली आहे. (woman wrote a letter to her husband boss asking work from home so she can get her sanity back goes viral)
दरम्यान, बऱ्याच काळापासून सुरू असणाऱ्या वर्क फ्रॉम होममुळे पत्नी तिच्या पतीच्या अनेक सवयींमुळे त्रस्त झाली होती. त्यामुळे तिने तिच्या पतीच्या बॉसला असे पत्र लिहिले. पत्नीने पत्रात असेही म्हटले आहे की, जर लवकर वर्क फ्रॉम होम बंद झाले नाही तर त्यांचे लग्न फार काळ टिकणार नाही. ज्यावेळी हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यावेळी अनेक लोकांनी म्हटले की, ही तर प्रत्येक घराघरातील कहाणी आहे.
हे पत्र उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'याला कसे उत्तर द्यावे, हे मला समजत नाही'. दरम्यान, हर्ष गोयंका यांनी केलेले हे ट्विट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटला आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
पत्नीने पत्रात लिहिले आहे... प्रिय सर, मी तुमच्या कर्मचारी मनोजची पत्नी आहे. तुम्हाला नम्र विनंती आहे की आता त्यांना वर्क फ्रॉम ऑफिसची परवानगी द्यावी. त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. ते कोविड प्रोटोकॉलच्या सर्व नियमांचे पालन करेल. जर जास्त काळ वर्क फ्रॉम होम सुरू राहिले तर नक्कीच आमचे लग्न टिकणार नाही.
याचबरोबर, पत्नीने पुढे लिहिले आहे की, पती दिवसातून 10 वेळा कॉफी पितो. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसून घाण करतो आणि वारंवार काहीतरी खाण्यासाठी मागतो. तसेच, ते कामाच्या मध्येच झोपतात. मला दोन मुलांची काळजी घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत, मला फक्त तुमचे सहकार्य हवे आहे जेणेकरून माझी 'मानसिक शांती' परत येईल.
दरम्यान, हे पत्र व्हायरल होताच लाखो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे. काहींनी सांगितले की, पतीला ताबडतोब ऑफिसला बोलावले पाहिजे. तर काहींनी व्यक्तीचा पगार वाढवण्याची सूचना केली. जेणेकरून तो आपल्या पत्नीला मदत करण्यासाठी घरात कॉफी मशीन आणू शकेल.