Garasia tribe live-in relationship : देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये तरूण-तरूणीने लग्नाआधीच सोबत राहणं आता कॉमन झालं आहे. याला लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणतात. पण लहान गावांमध्ये आजही या गोष्टीला चुकीचं मानतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, भारतात एक असंही गाव आहे जिथे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं कॉमन आहे आणि आई-वडिलच मुला-मुलींना याची परवानगी देतात. इतकंच नाही तर येथील महिला लग्नाआधीच बाळांना जन्म देतात.
ही अनोखी प्रथा राजस्थान आणि गुजरातमध्ये राहणाऱ्या गरासिया जमातीमध्ये बघायला मिळते. या लोकांमधील ही प्रथा बघाल तर आजच्या काळातील लिव्ह-इन रिलेशनशिपसारखीच आहे. या जमातीमधील लोक लग्न न करताना एका छताखाली राहतात आणि महिला लग्नाआधीच बाळांना जन्मही देतात. महिलांना याचा अधिकार असतो की, त्यांना त्यांच्या मनासारखा मुलगा निवडता यावा.
लग्नासाठी इथे दोन दिवसांची जत्रा भरते. या जत्रेत तरूण-तरूणी येतात आणि त्यांना कुणी पसंत आलं तर इथूनच त्यांच्यासोबत पळून जातात. मग ते लग्न न करताच एकमेकांसोबत राहू लागतात. यादरम्यान ते बाळांनाही जन्म देतात. ते त्यांच्या इच्छेवर असतं. त्यानंतर ते आपल्या आई-वडिलांकडे परत येतात तेव्हा त्यांचं लग्न लावून देण्यात येतं. ते लग्न न करताही सोबत राहू शकतात.
कशी सुरू झाली ही प्रथा
या जमातीमध्ये ही प्रथा अनेक वर्ष जुनी आहे. असं मानलं जातं की, अनेक वर्षाआधी या जमातीमधील चार भाऊ दुसरीकडे जाऊ राहू लागले. यातील 3 भावांनी भारतीय रितीरिवाजानुसार लग्ने केली. पण एक भाऊ लग्न करताच एका तरूणीसोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागला. त्या तिन्ही भावाला अपत्य झाली नाहीत. पण चौथ्याला बाळ झालं. तेव्हापासून या लोकांमध्ये लिव्ह-इनमध्ये राहण्याची परंपरा सुरू झाली. रिपोर्ट्सनुसार गरासिया महिला पहिला पार्टनर असतानाही दुसऱ्या जत्रेत जाऊन दुसरा पार्टनर निवडू शकतात.