जगभरात लग्नाबाबत वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आहेत. ज्यातील काही तर अशा असतात ज्यांवर विश्वासही बसत नाही. खासकरून काही आदिवासी जमातींमध्ये पार पाडल्या जाणाऱ्या प्रथा. कुठे नवरीला पळवून नेलं जातं तर कुठे मुलींचा बाजार भरवला जातो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका लग्नाच्या अजब परंपरेबाबत सांगणार आहोत. या जमातीमध्ये लग्नाआधी तरूणीला तब्बल 5 महिने मातीमध्ये रहावं लागतं.
आम्ही तुम्हाला सांगतोय हमार ट्राइबबाबत. ज्यात महिलांना लग्नाआधी 5 महिन्यांपर्यंत चिखलात ठेवलं जातं. यादरम्यान महिला ना कुणाला भेटू शकत ना ती बाहेर जाऊ शकत. एकप्रकारे होणारी नवरी 5 महिन्यांपर्यंत बंदीस्त असते. यावेळी महिलेच्या पूर्ण शरीरावर खासप्रकारची लाल माती लावली जाते, जी डोक्यापासून ते पायापर्यंत असते. या मातीला या जमातीमध्ये खास महत्व असतं.
तरूणांना लग्नासाठी दिलं जातं चॅलेंज
हमार ट्राइबमध्ये केवळ महिलांनाच लग्नासाठी आव्हान पार करावं लागतं असं नाही तर पुरूषांसाठीही आव्हान असतं. या जमातीमध्ये ज्या पुरूषांना लग्न करायचं असतं त्यांना बुल जंपचं आव्हान पार करावं लागतं. ज्यात पुरूषांना 3 किंवा 4 गायींच्या वरून उडी मारावी लागते.
सोबतच या जमातीमध्ये लग्नाची ईच्छा असणाऱ्या पुरूषाने काही गायी आणि बकऱ्या महिलेच्या कुटुंबियांना द्याव्या लागतात. तसेच या जमातीमध्ये लोक 3 ते 4 लग्न करू शकतात. पण यासाठी एक अटही असते. ती म्हणजे प्रत्येक लग्न करण्याआधी त्या महिलेच्या कुटुंबियांना गाय आणि बकऱ्या द्याव्या लागतात.