लग्न करणं हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचा निर्णय असतो. योग्य जोडीदार निवडण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. आजच्या काळातील टेक्नीक, खासकरून मोबाइल आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे याबाबत फार बदल झाला आहे. पण आता तर काही गोष्टी यापुढेही गेल्या आहेत. स्पेनच्या एका परफॉर्मिंग ऑर्टिस्टने आपला जोडीदार एक पुरूष नाहीतर एक एआयपासून तयार होलोग्रामला निवडण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती त्याच्यासोबत लग्नही करणार आहे.
एलिसिया फ्रामिस नावाच्या या महिलेचा होणारा पती एक डिजिटल प्रोडक्ट आहे. ज्याल होलोग्राफिक टेक्नीक आणि मशीन लर्निंगपासून तयार करण्यात आलं आहे. याद्वारे एलिसिया अशी पहिली महिला बनत आहे जी एका एआयपासून तयार डिजिटल वस्तूसोबत लग्न करेल. याला भविष्यातील रिलेशनशिप आणि लग्नाची पद्धत म्हणून बघितलं जात आहे.
एलिसियाने आधीच लग्नासाठी ठिकाण बुक करून ठेवलं आहे आणि ती तिचा वेडिंग ड्रेसही डिझाइन करत आहे. तिच्या होणाऱ्या पतीचं नाव एआईलेक्स आहे त्याला त्याच्या जुन्या साथीदारांच्या प्रोफाइल्सच्या मदतीने तयार करण्यात आलं आहे.
एकीकडे टेक्नीकच्या दुनियेत ओटीटीपासून ते जी-मेल सगळं काही पर्सनलाइज्ड झालं आहे. या गोष्टीची शक्यताही वाढत चालली आहे की, लोक खऱ्या मनुष्यांसोबत ताळमेळ ठेवण्याऐवजी आधीच आपला जोडीदार निवडणं पसंत करत आहेत. एलिसियाचं लग्न रोमॅंटिक नाहीये. तिचा पार्टनर नवीन प्रोजेक्ट हाइब्रिड कपलचा भाग आहे. ज्याद्वारे ती आपलं प्रेम आणि अंतरंगतेसोबत प्रयोग करत आहे.
एलिसियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात ती तिच्या होणाऱ्या पतीसोबत कुकिंग आणि डायनिंगसारखी रोजची कामे करत आहे. ती म्हणाली की, होलोग्राम आणि रोबोटसोबत प्रेम एक सत्य झालं आहे. ते चांगले साथीदार असतात जे तुमच्या भावना समजू शकतात. ज्याप्रकारे फोनने आपला एकटेपणा दूर केला.