Life Sentence In Prison: प्रेम हे कधी आणि कुठे कुणावर जडेल काहीच सांगता येत नाही. प्रेमात व्यक्ती वय, जात-पात, धर्म, गरीब-श्रीमंत कशाचाही विचार करत नाही. अशीच एक अवाक् करणारी प्रेम कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एक महिला अशा व्यक्तीच्या प्रेमात पडली, जो तुरूंगात हत्येसाठी शिक्षा भोगत आहे. महत्वाची बाब म्हणजे ही कहाणी १७ वर्षाआधी सुरू झाली होती आणि आता २१ वर्षानंतर दोघेही लग्नाचं प्लॅनिंग करत आहेत.
तुरूंगातच लग्न आणि हनीमून
कॅनडाच्या टोरांटोमध्ये राहणारी ब्रॉनवेनने नुकताच खुलासा केला की, तिचं लग्न आणि हनीमून दोन्ही तुरूंगातच होणार आहे. कारण तिचा होणारा पती जस्टिन जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. काही वर्षाआधी दोघांची भेट झाली होती. तरूणी तिच्या एका मैत्रिणीसोबत एकदा तुरूंगात गेली होती. तेव्हा तिची भेट जस्टिनसोबत झाली होती. जस्टिनने तिला लगेच प्रपोज केलं होतं. मात्र, ब्रॉनवेनने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. दुसरीकडे जस्टिन हार मानण्यास तयार नव्हता. तो तुरूंगातून ब्रॉनवेनला नेहमीच फोन करत होता. अखेर तिने त्याला एक संधी दिली.
काही दिवसांमध्ये दोघात पत्रांच्या माध्यमातून संवाद सुरू झाला. काही महिन्यातच दोघांचं नातं घट्ट झालं. दोघांमधील प्रेम वाढत गेलं. जस्टिनने ब्रॉनवेनचं मन जिंकलं होतं. पण अजूनही दोघांची समोरासमोर भेट झाली नव्हती. तरीही त्यांचं नातं मजबूत झालं होतं. काही कारणाने दोघे एकमेकांपासून दूर झाले. मात्र, पुन्हा १२ वर्षांनी ब्रॉनवेनने जस्टिनला संपर्क केला. जस्टिन यावेळी वेगळ्या तुरूंगात कैद होता. अशात ब्रॉनवेनने त्याला शोधून काढलं. तो अजूनही सिंगल होता. दोन आठवड्यात त्यांनी साखरपूडा केला आणि आता ते लग्नाची तयारी करत आहेत.