देने वाला जभ्भी देता देता छप्पर फाडके. एका महिलेला याचा चांगलाच अनुभव आलाय. फ्लाईट कॅन्सल झाल्यावर या महिलेनं तब्बल ७ करोड रुपये जिंकले. आता तुम्ही म्हणाल फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे कुणी पैसे जिंकत का? पण या महिलेच्या बाबतीत हे खरं ठरलंय.
या महिलेचं नाव एंजेला कैरावेला असं आहे अन् ती मिसोरीच्या कॅनसास शहरात राहते. या महिलेचे विमान रद्द झाले. ती ज्या विमानतळावर होती त्याच शहरातील सुपरमार्केटमध्ये तिने 'द फास्टेस्ट रोड टू यूएसडी 10,00,000' हा गेम खेळला. या गेममध्ये तिला लॉटरी लागली आणि तिने १० लाख डॉलरची रक्कम जिंकली. एंजेलाने सांगितले, की फ्लाईट कॅन्सल झाल्यावर तिला काहीतरी विचित्र वाटत होते. वेळ घालवण्यासाठी तिने लॉटरीची काही तिकिटे खरेदी केली आणि १० लाख डॉलर सहज जिंकले.
या महिलेने फ्लाईट कॅन्सल झाल्यावर तांपा येथे ब्रॅंडन मधील पब्लिक्स सुपरमार्केट येथुन तिकिट खरेदी केले होते. जिथुन तिने तिकिट खरेदी केले त्या स्टोरला २००० डॉलर्स बोनस म्हणून देण्यात आले. लॉटरीचा हा खेळ २०२०मध्ये सुरु झाला होता. यात ९४.८ करोड पर्यंत बक्षिसे आहेत.