World's biggest robbery : लोक पैसे कमावण्यासाठी अलिकडे फार शॉर्टकट पद्धतींचा वापर करत आहेत. पण शॉर्टकट कधी कधी नशीब चमकवतं तर कधी कधी तुम्हाला रस्त्यावर आणतं. काही लोकांना पैसे चोरी करून जीवन जगण्यात फार मजा येते. चोरी आणि दरोड्याच्या अनेक अजब घटनांबाबत तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. आज आम्ही तुम्हाला एका अशा दरोड्याबाबत सांगणार आहोत ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल.
ज्या दरोड्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो दरोडा यशस्वी ठरू शकला नाही. कारण ते दरोडा टाकणार त्याच्या काही दिवसांआधीच पकडले गेले. जर त्यांनी दरोडा टाकला असता तर ती इतिहासातील सगळ्या मोठी चोरी ठरली असती. या दरोड्याची तयारी चार महिन्यांपासून सुरू होती. इतकंच नाही तर हा दरोडा यशस्वी करण्याच्या प्लानसाठी चोरांनी तब्बल 11 कोटी रूपये खर्च केले होते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, दरोड्यासाठी इतकी मोठी रक्कम का खर्च करण्यात आली? याचं कारण म्हणजे दरोडा यशस्वी झाला असता तर चोरांना 2 खरब रूपये मिळाले असते. इतक्या मोठ्या रकमेने देशाची अर्थव्यवस्था ढासळली असती. कारण लहान देशांसाठी ही रक्कम त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या बरोबर आहे.
हा दरोड होणार होता ब्राजीलचं शहर साउ पाउलमध्ये. गॅंगमधील 20 चोरांनी 2017 मध्ये या दरोड्याचं जबरदस्त प्लानिंग केलं होतं. दरोडेखोर साउ पाउलची सरकारी बॅंक बॅंको दो ब्राझील (Banco do Brasil) लुटणार होते.
2017 च्या जूनमध्ये दरोडा टाकण्यासाठी चोरांनी बॅंकपासून 500 मीटर अंतरावर एक घरा भाड्याने घेतलं होतं. त्यांनी घरापासून ते बॅंकेपर्यंत भुयार खोदला. हे सगळं करण्यासाठी त्यांना साधारण साडे तीन महिन्यांचा वेळ लागला. भुयार बनवण्यासाठी लोखंड आणि लाकडांचा वापर करण्यात आला होता. यात ऑक्सिजनची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. जेणेकरून कुणाचा श्वास गुदमरणार नाही. सगळीकडे लाइट लावले होते.
दरोड्यानंतर गायब होण्यासाठी चोरांनी 7 कार चोरी केल्या होत्या. अशात पोलिसांना संशय आला की, बॅंकेत दरोड्याचं प्लानिंग सुरू आहे. वेळेत पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात ऑपरेशन सुरू केलं आणि 16 लोकांना अटक केली. पण पोलिसांना साधारण साडे तीन महिने याबाबत काहीच माहीत नव्हतं. जर काही दिवसांचा उशीर झाला असता तर जगातल्या सगळ्यात मोठी चोरी करून चोर पसार झाले असते.