भारताच्या मिझोरमच्या बक्तावंग गावात जगातील सगळ्यात मोठ्या परिवाराचं घर आहे. या एकूण 199 लोक राहतात जे एकाच घरात एकत्र राहतात. या घराचा प्रमुख पु जिओना नावाची व्यक्ती आहे. जिओना याना 38 पत्नी, 89 मुले, त्यांच्या पत्नी आणि 36 नातवंड आहेत. हाय ब्लड प्रेशर आणि शुगरमुळे 2021 मध्ये 76 वयात जिओना यांचं निधन झालं. पण त्यांचा परिवार आजही बक्तावंगच्या डोंगरात असलेल्या त्यांच्या विशाल घरात राहतो.
सोबतच जेवतात सगळे
त्यांच्या काही मुलांची लग्ने झाली आहेत. काहींना एकापेक्षा जास्त पत्नी आहेत. अशात परिवारातील एकूण लोकांची संख्या बघावी तर 199 आहे. सगळेच दिवसातून दोन वेळा घरातील मोठ्या हॉल सोबत जेवण करण्यासाठी जमा होतात. घरातील सगळेच लोक घरातील कामकाज असो वा बाहेरचं काम सगळे वाटून घेतात.
तयार होतंय नवीन आणि आणखी मोठं घर
परिवारातील काही लोक आपल्या मुलांना बाहेर अशा ठिकाणी पाठवायला तयार आहेत जिथे त्यांना चांगलं शिक्षण मिळेल. त्यांचं भविष्य चांगलं होईल. वाढता परिवार बघता गावातच एक नवीन घर बांधलं जात आहे. जेणेकरून परिवार जास्त वेळ सोबत रहावा. या परिवारामुळे हे गाव पर्यटकांसाठी आकर्षण आहे. जिओनाच्या एका लहान मुलाने एका मीडियाला सांगितलं होतं की, 'मी माझ्या वडिलांसारखा नाही. त्यांना देवाने निवडलं होतं. पण आम्ही सामान्य माणसं आहोत आणि त्यांच्यासारखे अनेक पत्नी करू शकत नाही'.
इतक्या लग्नांना विरोध का झाला नाही?
एकेकाळी पु जिओना मिझोरम राज्यात चुआन थार कोहरान नावाने ओळखल्या जाणाऱ्या सहस्राब्दी ईसाई संप्रदाय म्हणजे ख्रिश्चन समुदायाचे नेतृत्व करत होते. अनेक लोक त्यांना देवाचं रूप मानत होते. त्यामुळे त्यांनी जेव्हा एकापाठी एक लग्ने केली तेव्हा त्यांना समुदायाने किंवा परिवाराने विरोध केला नाही. उलट स्थानिक लोक आनंदाने आपल्या मुलीचं लग्न त्यांच्याशी लावत होते. चुआन थार कोहरान बहुविवाहाचं समर्थन करतात आणि या समुदायाचे 2,600 सदस्य आहेत ज्यातील जास्तीत जास्त बक्तावंगमध्ये राहतात.
घर कसं चालतं?
पु जिओना यांच्या निधनानंतर आजही त्यांना लोक इथे खूप मानतात. त्यांचे फोटो आपल्या घरात लावतात. परिवार आजही जिओना यांचे मूल्य आणि तत्वांचं पालन करतात. 199 सदस्यांचा परिवार एकत्र ठेवणं, खाऊ घालणं, कपडे आणि सगळ्याच आवश्यक गोष्टी पुरवणं हे काही सोपं काम नाही. घरातील सगळेच लोक खर्चापासून ते घरातील कोणत्याही कामात योगदान देतं. काही लोक मांसासाठी जवळपास 100 डुकरांचं फार्म चालवतात. काही शेतात काम करतात तर काही वेगळी काही कामे करतात.
एका दिवसात किती धान्य लागतं
या दिवसात दोन वेळचं जेवण बनवणं हे मोठं काम असतं. त्यांना रोज कमीत कमी 80 किलो तांदूळ आणि इतर अनेक गोष्टी लागतात. जेवण मोठ्या भांड्यांमध्ये तयार केलं जातं. नंतर सगळे मिळून स्वच्छता करतात. कुणीही तक्रार करत नाही. एकीकडे एकत्र कुटुंब पद्धती मागे पडत चालली आहे अशात हा परिवार मात्र अजूनही सोबत आहे.