शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

या पाण्याच्या बॉटलच्या किंमतीत येईल महागडी ऑडी कार, जाणून घ्या इतक्या किंमतीचं कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 4:13 PM

Most Expensive Bottle : आज आम्ही तुम्हाला पाण्याच्या एका अशा बॉटलबाबत सांगणार आहोत, जिची किंमत हजारो नाही तर लाखो रूपये आहे. चला जाणून घेऊ या बॉटलमध्ये असं काय आहे की, याची किंमत लाखो रूपये आहे. 

Most Expensive Bottle : पाण्याची बॉटल आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग बनली आहे. घरात थंड पाणी असो  वा ऑफिसला बॉटल घेऊन जाणं असो किंवा प्रवासात पाण्याची बॉटल ही असतेच. बाजारात प्लास्टिकपासून ते स्टील, तांब्याच्या बॉटल उपलब्ध असतात. यांची किंमत क्वालिटीनुसार, फार फार तर 100 ते 200 रूपये असते. पण आज आम्ही तुम्हाला पाण्याच्या एका अशा बॉटलबाबत सांगणार आहोत, जिची किंमत हजारो नाही तर लाखो रूपये आहे. चला जाणून घेऊ या बॉटलमध्ये असं काय आहे की, याची किंमत लाखो रूपये आहे. 

ही बॉटल इतकी महाग आहे की, किंमतीसाठी तिची नोंद गिनीज बुकमध्येही करण्यात आली आहे. एक्‍वा डि क्रिस्टॅलो ट्रिब्‍यूटो ए मॉडिग्‍लीयानो (Acqua di Cristallo Tributo a Modigliani) नावाची ही बॉटल गेल्या 13 वर्षापासून जगातली सगळ्यात महागडी आणि फॅशनेबल वॉटल वॉटलच्या रूपात ओळखली जाते. गिनीज बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डमध्ये या बॉटलची नोंद 2010 पासून केली गेली आहे.

काय आहे इतकी महाग असण्याचं कारण...

या बॉटलमध्ये भरलेल्या पाण्याबाबत सांगायचं तर यात केवळ 750 एमएल पाणी भरलेलं असतं. ज्याची किंमत 50 लाख रूपये आहे. याचं कारण बॉटलची खास पॅकेजिंग आणि डिझाइनमुळे आहे. मुळात ही बॉटल 24 कॅरेट शुद्ध सोन्याने तयार केली आहे. यात भरलेल्या पाण्यात 5 ग्राम 24कॅरेट गोल्ड मिक्स केलं आहे. इतकंच नाही तर यात भरलेलं पाणी पृथ्वीवरील सगळ्यात शुद्ध पाणी आहे. हे पाणी आइसलॅंड, फिजी आणि फ्रान्सच्या ग्लेशिअरमधून आणण्यात आलं आहे.

डिझायनमुळे इतकी महाग

या बॉटलची डिझाइन जगभरात आपल्या क्लासिक डिझाइनसाठी प्रसिद्ध आर्टिस्‍ट फरनांडो अल्‍टमिरानो यांनी तयार केलं आहे. याच्या खास आणि क्लासिक डिझाइनमुळे 2010 मध्ये या बॉटलला एका लिलावात 60 हजार डॉलर म्हणजे 48.60 लाख रूपये बोली लागली होती. आपल्या डिझाइनसाठी या बॉटलला पुरस्कारही मिळाला होता.

जगात फक्त एकच पीस

ट्रिब्‍यूटो मोडिग्लियानी आपल्यासारखी जगातील एकच बॉटल आहे. ही गोल्डशिवाय प्लॅटिनम आणि हाय क्वालिटी डायमंडने तयार करण्यात आली आहे. ही बॉटल तयार करणारी कंपनी अल्‍टमिरानोने सामाजिक कार्यासाठी 5 लाख यूरो दान केले आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स