सामान्यपणे एखादी गाय विकत घ्यायची असेल तर किंमत साधारण 4 ते 10 लाख रूपयांदरम्यान राहते. पण तुम्हाला जर आम्ही सांगितलं की, एक गाय 40 कोटी रूपयांना विकली गेली तर तुम्हाला विश्वास बसेल का? या गायीचं भारताशी खास कनेक्शन आहे. जनावरांच्या लिलाव विश्वात हा एक नवीन रेकार्ड कायम झाला आहे.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ही गाय आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमधील आहे. या गायीला वियाटिना-19 एफआयव्ही मारा इमोविस नावाने ओखळलं जातं. ब्राझीलमध्ये एका लिलावादरम्यान या गायीला 4.8 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी किंमत मिळाली. भारतीय करन्सीनुसार ही किंमत 40 कोटी रूपये इतकी होते. आता ही जगात सगळ्यात महागडी विकली गेलेली गाय झाली आहे. ही गाय मूळची भारतातील आहे.
या गायीचं नाव नेल्लोर जिल्ह्याच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. ब्राझीलमध्ये या प्रजातीच्या गायीला खूप मागणी आहे. वैज्ञानिकांनुसार, ही गाय पर्यावरणाच्या हिशेबाने स्वत:त बदल करते. ही प्रजाती 1863 मध्ये जहाजाने पहिल्यांदा ब्राझीलला पाठवण्यात आली होती. 1960 च्या दशकात आणखी काही गायी तिथे नेण्यात आल्या.
काय आहे खासियत
ओंगोल प्रजातीच्या या गायींची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे या गायी जास्त तापमानातही राहू शकतात. कारण त्यांचं मेटाबॉल्जिम चांगलं आहे. त्यांना कोणतंही इन्फेक्शन होत नाही. ब्राझीलमध्ये खूप जास्त उष्ण वातावरण असतं. त्यामुळे या गायी तिथे खूप पसंत केल्या जातात. येथील लोक या गायी पाळतात. या गायींचं ब्रीड जेनेटिकली विकसित करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना होणारे बछडे आणखी चांगले होतील. ब्राझीलमध्ये जवळपास 80 टक्के गायी या नेल्लोर गायी आहेत.