World Most Expensive Pillow: झोपताना डोक्याखाली उशी घेणं सामान्य बाब आहे. सामान्यपणे बाजारात 200 ते 300 रूपयात चांगल्यात चांगली उशी मिळते. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, नुकतीच एक उशी अर्ध्या कोटी रूपयांना विकली गेली आहे. आता प्रश्नही पडेल की, या उशीत असं काय आहे की, तिला इतकी किंमत मिळाली? तर चला जाणून घ्या या खास उशीची खासियत..
WION च्या एका रिपोर्टनुसार, जगातली सर्वात महागडी उशी नेदरलॅंडच्या एका फिजिओथेरपिस्टने डिझाइन केली आहे. खासकरून डिझाइन करण्यात आलेली ही उशी बनवण्यासाठी या फिजिओथेरपिस्टने त्याच्या आयुष्यातील 15 वर्ष खर्ची केले. इतके वर्ष मेहनत केल्यानंतर शेवटी त्याला ही खास उशी तयार करण्यात यश मिळालं.
काय आहे उशीच्या आत?
आता या खास उशीची खासियत जाणून घेऊ. या उशीच्या आत सोनं, हिरे आणि नीलमसारखे अनेक रत्न लावले आहेत. या उशीच्या आतील कॉटन रोबोट मिलिंग मशीनचा असतो. या उशीच्या झिपमध्ये चार हिरे लावले आहेत. अशाप्रकारच्या एक नाही तर अनेक उश्या तयार केल्या आहेत. त्यामुळे या उशी अशाच विकल्या जाऊ शकत नाहीत.
काय आहे खासियत?
ही शानदार उशी डिझाइन करणाऱ्या फिजिओथेरपिस्टने दावा केला आहे की, ज्या लोकांनी झोप न येणे, घोरणे किंवा डोकेदुखीची समस्य आहे, त्या लोकांसाठी ही उशी फारच फायदेशीर आहे. फिजिओथेरपिस्टनुसार, रात्री या खास उशीवर डोकं ठेवताच लगेच झोप येऊ लागते आणि अनेक प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्ती मिळते.
किती आहे या उशीची किंमत?
या खास उशीची किंमत 57 हजार डॉलर म्हणजे 45 लाख रूपये आहे. या उशीची हीच किंमत ठेवण्यात आली आहे आणि नेदरलॅंडमधून चांगली मागणीही आहे. अर्थातच ही उशी श्रीमंत लोकांसाठीच आहे. जे त्यासाठी इतके पैसे खर्च करू शकतात.