Gold Toilet Paper : टॉयलेट पेपर तुम्ही कधीना कधी वापरला असेलच, सामान्यपणे सगळीकडे पांढरा टॉयलेट पेपर रोल वापरला जातो. जो वापरायला मुलायम आणि सोपा असतो. या टॉयलेट पेपर रोलची किंमत सामान्यपणे १०० ते ५०० रूपयांपर्यंत पकडूया. तेवढीच किंमत असायला हवी. पण आज आम्ही तुम्हाला एका लाखो रूपयांच्या टॉयलेट पेपरबाबत सांगणार आहोत. आता तुम्ही म्हणाला यात असं काय आहे की, याची लाखो रूपये किंमत आहे? तर शौकीन लोकांची या जगात कमी नाही. अशांसाठी हा टॉयलेट पेपर बनवला गेला आहे.
जगातील सगळ्यात महाग टॉयलेट पेपर
जगातील सगळ्यात महाग टॉयलेट पेपर सोन्यापासून तयार करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाची कंपनी टॉयलेट पेपर मॅनने हा बनवला आहे. या कंपनीने २२ कॅरेट सोन्यापासून हा पेपर बनवला आहे. याच्या एका रोलच्या किंमतीत तुम्ही खूपकाही घेऊ शकता. कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे की, त्यांच्याकडील सोन्यापासून तयार हा टॉयलेट पेपर विकला गेला आणि आता स्टॉक नाही.
किती आहे किंमत?
कंपनीने या टॉयलेट पेपरची किंमत १०,७५,४५,७५० रूपये ठेवली होती. तसेच यासोबत एक शॅम्पेन मोफत दिली होती. कंपनीनुसार सोन्यापासून बनवलेला हा टॉयलेट पेपर मुलायम आहे.
एका रिपोर्टनुसार, हा पेपर तयार करणाऱ्या कंपनीनुसार, सोन्यापासून टॉयलेट पेपर बनवण्याची आयडिया त्यांना दुबईतील घरांमध्ये आणि हॉटेल्समध्ये बनलेल्या सोन्याच्या टॉयलेट सीटपासून आली होती. कंपनीला वाटलं की, जर टॉयलेट सीट सोन्याची आहे तर मग टॉयलेट पेपरही सोन्याचा असावा.