World Oldest bird Viral Photo: जगातील सर्वात जुना पक्षी किती वर्षांचा असेल याचा कधी विचार केला आहे? किंवा तो कसा दिसेल, याचा अंदाज बांधता येईल? सध्या एका पक्ष्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. लेसन अल्बाट्रोस प्रजातीच्या या पक्ष्याचे नाव विस्डम असून 'यूएस फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिस पॅसिफिक'ने या पक्ष्याचे जगातील सर्वात जुने पक्षी म्हणून वर्णन केले आहे. तो नुकताच अमेरिकेत परतला आहे. वन्यजीव अधिकाऱ्यांच्या मते या पक्ष्याचे वय सरासरी पक्ष्यांच्या वयापेक्षा जास्त आहे. या पक्ष्याचे वय जाणून सारेच अवाक झाले आहेत. सोशल मीडियावर काही युजर्सनी सांगितले आहे की हा पक्षी आमच्या आजी-आजोबांपेक्षाही मोठा आहे.
पक्ष्याचं वय नक्की आहे तरी किती?
@USFWSPacific या ट्विटर हँडलने हा फोटो ८ डिसेंबर रोजी शेअर केला होता. त्यांनी Wisdom नावाचा जगातील सर्वात जुना मादी पक्षी असे कॅप्शन दिले होते. तो नुकताच यूएस मधील मिडवे अॅटोल येथे सापडला. 'लेसन अल्बाट्रोस' प्रजातीच्या या पक्ष्याचे वय किमान ७१ वर्षे आहे. जीवशास्त्रज्ञांनी १९५६ मध्ये प्रथम 'विस्डम' शोधून काढला आणि त्याला लेबलिंग केले. या माहितीपूर्ण ट्वीटला हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, त्यांनी आणखी काही ट्विट करून विस्डमशी संबंधित मनोरंजक माहितीही शेअर केली.
विस्डम तिच्या प्रसिद्ध बँड क्रमांक Z333 साठी प्रसिद्ध आहे. पहिल्या थँक्स-गिव्हिंग डे च्या दिवशी तिला पाहण्यात आले होते. तिने दिलेल्या अंड्याबाबत अभ्यासपूर्ण परिक्षण केल्यानंतर तिने १९५६ साली पहिल्यांदा अंड दिलं असल्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. मोठे मादी जलचर हे ५ वर्षांच्या वयाआधी अंड देत नसल्याच्या सिद्धांतावरून असा अंदाज बांधण्यात आला आहे की विस्डमचे वय अंदाजे ७१ वर्षे असेल. पण तिचा दीर्घकाळचा जोडीदार अजून दिसलेला नाही. गेल्या नेस्टिंग सीझन मध्येही तो नव्हता. खरे पाहता, नर पक्षी हे प्रजनन स्थळावर सर्वप्रथम परतात. पण याबाबत असे झालेले दिसत नाही. विस्डमबद्दल असा अंदाज आहे की तिने तिच्या आयुष्यात ५०-६० अंडी आणि ३० पेक्षा जास्त पिल्लांना जन्म दिला आहे.