नवी दिल्ली-
इराणच्या २० वर्षीय तरुणाला जगातील सर्वात कमी उंचीचा किताब देण्यात आला आहे. अफशिन इस्माइल घादेरजादेह (Afshin Esmaeil Ghaderzadeh) असं या तरुणाचं नाव असून जगातील सर्वात कमी उंचाचा तरुण म्हणून त्याचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. त्याची उंची अवघी २ फूट १ इंच आणि वजन ६.५ किलो इतकं आहे. त्याचं शरीर खूप कमकुवत आहे की ज्यामुळे त्याला मोबाइल फोनचा देखील वापर करता येत नाही.
अफशिनचा जन्म झाला तेव्हा त्याचं वजन फक्त ७०० ग्रॅम इतकं होतं. इराणच्या वेस्ट अजरबेजान प्रोव्हिंसच्या बुकान काऊंट येथील तो रहिवासी आहे. त्याची उंची केवळ २ फूट १ इंच इतकी आहे. गिनिग बुकात नाव नोंदवलं गेल्यामुळे जगात आपली वेगळी ओळख होईल आणि लोक आपल्याला ओळखू लागतील तसंच आपली मदतही करतील असं अफशिन याला वाटतं.
अफशिन यानं कोलंबियाच्या २.७ इंचाच्या ३६ वर्षीय Edward "Nino" Hernandez याचा रेकॉर्ड मोडला आहे. अफशिननं सांगितलं की तो शाररीकरित्या इतका कमकुवत आहे की तो कधी शाळेत जाऊ शकलेला नाही. तसंच त्याला कोणतंही कामही मिळत नाही. मोबाइल फोनही त्याला जड वाटतो. त्यामुळे मोबाइल फोनही हातात धरण्यास त्याला अडचण येते. शाररीकरित्या कमकुवत असल्यानं त्याला कधीच शाळेत जाता आलेलं नाही. पण मानसिकरित्या तो खूप सक्षम आहे, असं त्याचे वडील सांगतात. अफशिनचं वय सध्या २० वर्ष असलं तरी त्याला ३ वर्षांच्या मुलाचे कपडे होतात.
कार्टून पाहण्याची आवडअफशिन त्याचा दिवसभरातील बराचसा वेळ कार्टुन पाहण्यात व्यतित करतो. टॉम अँड जेरी त्याचं आवडतं कार्टून आहे. नुकतंच त्यानं इंस्टाग्रामवर @mohamadghaderzadeh_official नावानं अकाऊंटही सुरू केलं आहे. अफशिनचं दुबईतील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाच्या टॉपवर जाण्याचं स्वप्न आहे.