शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
3
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
4
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
5
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
6
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
7
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
8
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
9
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
10
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

टायटॅनिकपेक्षा दुप्पट; जगातील सर्वात मोठ्या जहाजाचा भारतात शेवट, पण का? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 3:34 PM

अनेक वर्षे समुद्रावर राज्य करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या जहाजाचा गुजरातमध्ये शेवट झाला.

Worlds Biggest Ship: आज जगभरात एकापेक्षा एक अवाढव्य जहाजे आहेत. पण, 1912 मध्ये 'टायटॅनिक' जगातील सर्वात मोठे जहाज होते. त्याची लांबी सुमारे 882 फूट होती. पण हे जहाज आपल्या पहिल्याच प्रवासात बुडाले आणि या अपघातात सुमारे 1500 लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर अनेकवर्षे मोठी प्रवासी जहाजे पाहायला मिळाली नाही. पण, मोठ्या आकाराची मालवाहू जहाजे बांधली जात होती. आज आम्ही अशाच एका जहाजाबद्दल सांगणार आहोत, जे टायटॅनिकच्या जवळपास दुप्पट लांबीचे होते. विशेष म्हणजे, त्या जहाजाचा शेवट भारतात झाला.

जपानने 1979 मध्ये एक अवाढव्य जहाज तयार केले होते. 30 वर्षे समुद्रावर राज्य केल्यानंतर हे जहाज भारतातील गुजरातमध्ये मरण पावले, म्हणजेच त्याचा शेवट झाला. जपानच्या सुमितोमो हेवी इंडस्ट्रीजने 1974-1979 दरम्यान या जाहाजाची निर्मिती केली होती. 'Seawise Giant' असे या महाकाय जहाजाचे नाव होते. सुरुवातीपासूनच जहाज अनेक वादांशी संबंधित होते.

मालकाने ते घेण्यास नकार दिलाया जहाजाच्या नशिबात पहिल्यापासून वेदना लिहिल्या होत्या. हे जहाज जपानच्या ओप्पामा शिपयार्डमध्ये तयार करण्यात आले, परंतु त्याच्या ग्रीक मालकाने ते घेण्यास नकार दिला. नंतर चीनच्या सी.वाय. तुंगने हे विकत घेतले. या जहाजाला ‘जहारे वायकिंग’ या नावाने सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. याची लांबी सुमारे 1500 फूट होती. ते प्रामुख्याने तेल टँकरच्या वाहतुकीसाठी वापरले जात असे. 1988 मध्ये कच्च्या तेलाची वाहतूक करत असताना सद्दाम हुसेनच्या हवाई दलाने त्यावर हल्ला केला. 

गुजरातमध्ये झाला शेवटनंतर याची दुरुस्ती करण्यात आली आणि 1991 मध्ये नॉर्वेजियन कंपनीला विकले. त्यावेळी हे जगातील सर्वात मोठे जहाज होते. सुमारे 30 वर्षे समुद्रावर राज्य केल्यानंतर ते 2009 मध्ये गुजरातमध्ये पोहोचले. येथे हे जहाज जगातील सर्वात मोठ्या शिप ब्रेकिंग यार्डांपैकी एक असलेल्या 'अलंग'मध्ये उतरवण्यात आले. हे जहाज तोडण्यासाठी वर्षभरात सुमारे 1000 मजूर लागले. या जहाजाचा नांगर सुमारे 36 टन होता. जगातील सर्वात मोठे जहाज असणे हा त्याच्यासाठी शाप ठरला. हे जहाज जगातील अनेक प्रमुख व्यापारी मार्ग पार करू शकले नाही. यात पनामा कालवा, सुएझ कालवा आणि इंग्लिश चॅनेलचा समावेश आहे. यामुळेच अखेर या जहाजाला तोडण्यात आले.

टॅग्स :GujaratगुजरातJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स