भारतात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता तुम्ही अनेक ट्रेन्स क्वारंटाइन सेंटरमध्ये रूपांतरित होताना पाहिलं असेल. पण तुम्हाला जगातल्या पहिल्या आणि भारतातील एकमात्र हॉस्पिटल ट्रेन लाइफलाईन एक्सप्रेसबाबत माहीत आहे का?
होय..भारतात एक अशी ट्रेन आहे जी कोणत्याही प्रकारच्या रूग्णावर मोफत उपचार करते. ही ट्रेन एक चालतं फिरतं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल ट्रेनचं नाव आहे लाइफलाईन एक्सप्रेस. जी भारतीय रेल्वेने १९९१ मध्ये पहिल्यांदा चालवली होती. सध्या ही ट्रेन आसामच्या बदरपूर स्टेशनवर तैनात आहे.
रेल्वे मंत्रालयानुसार भारतीय रेल्वेने जगातली पहिली हॉस्पिटल ट्रेन तयार करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. जगातल्या कोणत्याही देशाकडे अशाप्रकारची ट्रेन नसल्याचं बोललं जातं. १९९१ मध्ये चालवण्यात आलेल्या या लाइफलाईन एक्सप्रेसचा मुख्य उद्देश देशभरातील, खेड्यापाड्यातील परिसरात भ्रमण करून गरजू लोकांची मदत करणं हा आहे.
हॉस्पिटल ट्रेनमध्ये २ ऑपरेशन थिएटर
लाइफलाईन एक्सप्रेसला जीवन रेखा एक्सप्रेस म्हणूनही ओळखलं जात. ७ डब्यांच्या या ट्रेन हॉस्पिटलमध्ये एका हॉस्पिटलप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यात दोन मॉडर्न ऑपरेशन थिएटर आणि ५ ऑपरेटींग टेबल, मेडिकल स्टाफ रूमसहीत अनेक सुविधा आहेत.
ही लाइफलाईन एक्सप्रेस इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशन भारतील रेल्वेसोबत मिळून चालवली जाते. ही खास ट्रेन भारताच्या वेगवेगळ्या भागातून जाते. त्यानंतर आपल्या शेड्यूलच्या हिशेबाने वेगवेगळ्या स्टेशनवर थांबते. इथे लोक वेगवेगळे उपचार घेऊ शकतात.