साहित्य लिहिण्याचा इतिहास हा फार जुना आहे. जगातल्या बऱ्याचशा कादंबऱ्या फार काळापूर्वी लिहिल्या गेल्या होत्या. आणि वर्तमानातही त्यांच्या प्रती उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त कादंबऱ्यांच्या पहिल्या हस्तलिखित प्रती एकतर लुप्त झाल्या आहेत नाही तर हरवल्या आहेत. अशीच जगातली पहिली कादंबरी मानल्या जाणाऱ्या 'द टेल ऑफ जेंजी'चा हरवलेला काही भाग सापडला आहे.
जाणकारांनुसार, हा सापडलेला भाग कादंबरीचा पाचवा भाग आहे. कादंबरीचा हा हरवलेला भाग टोकियोमध्ये सापडला आहे. इथे राहणारे मोटोफुयु ओकाची यांच्या रेस्टरूममध्ये कादंबरीचा हा भाग सापडला आहे.
(Image Credit : theguardian.com)
'द टेल ऑफ जेंजी' नावाची ही कादंबरी मुरासाकी शिकिबु नावाच्या महिलेने १०व्या शतकात लिहिली होती. कादंबरी मिकवा-योशिदा डोमेन वंशाच्या जपानी सम्राटाचा मुलगा जेंजी याच्या जीवनावर आधारित आहे. एकूण ५४ अध्याय असलेली ही कादंबरी १०व्या ते ११व्या शतकात लिहिण्यात आली होती आणि यात जेंजीच्या युद्ध कौशल्याबाबत, राजकिय आणि रोमॅंटिक जीवनाचा उल्लेख आहे.
(Image Credit : e-nigeriang.com)
ही कादंबरी ज्या व्यक्तीच्या स्टोररूममध्ये मिळाली, त्या परिवाराचा संबंध मिकवा-योशिदा डोमेन वंशासोबत असल्याचं सांगितलं जात आहे. या कादंबरीची सर्वात जुनी आवृत्ती कवी फुजिवारा टीका यांनी पुन्हा लिहिली होती आणि १२४१ मध्ये त्यांचं निधन झालं होतं. अभ्यासकांनुसार, कादंबरीच्या ५४ अध्यायांपैकी केवळ चारच टीका यांनी पुन्हा लिहिल्याचं सिद्ध झालं होतं. आता समोर आले आहे की, हा पाचवा भागही फुजिवारा टीका यांनीच पुन्हा लिहिला होता.