चीनच्या बीजिंगमध्ये एक नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ नुकतंच सुरू झालं आहे. हे जगातलं सर्वात मोठं विमानतळ असल्याचं बोललं जात असून या विमानतळाचं नाव दाक्जिंग असं आहे. चीनच्या कम्युनिस्ट सरकारचे ७० वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने बुधवारी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, १७३ एकर परिसरात तयार करण्यात आलेलं हे विमानतळ फुटबॉलच्या १०० मैदानांच्या बरोबरीचं आहे. यात एक मोठं गार्डन असून देशातील आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी वेगवेगळे टर्मिनल तयार करण्यात आले आहेत.
(Image Credit : hypebeast.com)
दाक्जिंग जिल्हा आणि लांगफांगच्या सीमेवर असलेलं हे एअरपोर्ट दिसायला एखाद्या अंतराळ यानासारखं वाटतं. आता या विमानतळावर बुधवारपासून उड्डाणाला सुरूवात झाली आहे. दावा केला जात आहे की, दरवर्षी साधारण १० लाख प्रवाशी या विमानतळाहून प्रवास करतील.
(Image Credit : Social Media)
या विमानतळाच्या टर्मिनलखाली एक ट्रेन स्टेशन आणि मेट्रो लाइन सुद्धा तयार करण्यात आली आहे. याने प्रवाशी केवळ २० मिनिटांमध्ये शहराच्या केंद्र स्थानी पोहोचतील.
(Image Credit : caixinglobal.com)
हे विमानतळ तयार करण्यासाठी साधारण १७ खर्व(खरब) ७४ अब्ज रूपये खर्च करण्यात आल्याचं बोललं जात आहे. हेच कारण आहे की, हे विमानतळ जगातलं सर्वात महागडं मानलं जात आहे. ब्रिटीश आर्किटेक्ट जाहा हदीद यांनी या विमानतळाचं डिझाइन तयार केलं आहे. पण या विमानतळाचं काम पूर्ण झाल्याच ते बघू शकले नाहीत, कारण २०१६ मध्ये त्यांचं निधन झालं.